‘बीआरएस’ चे नेते माणिकराव कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0 355

मुंबई दि. १९ मार्च – भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे पक्षप्रवेश पार पडला.यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल राज्यप्रमुखपदी माणिकराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. माणिकराव कदम व त्यांचे सहकारी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य करतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, आमदार प्रकाश सोळंके, कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.

error: Content is protected !!