नीट परीक्षा रद्द करा,सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल

0 54

NEET परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. हेच नाही तर आता विद्यार्थ्यांनी थेट नीट परीक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीये. दोन विद्यार्थ्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आलीये. नीट परीक्षेचा मुद्दा लोकसभेत मांडणार असल्याचे राहुल गांधी यांच्याकडूनही स्पष्ट करण्यात आलंय. मोठा गोंधळ या परीक्षेत झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. हेच नाही तर अनेकांना या परीक्षेत अधिकचे मार्क पडल्याचे देखील दिसत आहे. नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे देखील बघायला मिळतंय. देशभरातून विद्यार्थ्यांमध्ये रोष बघायला मिळतोय.

द्यार्थ्यांना मनमानी पद्धतीने वाढीव गुण देण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना मिळालेले ७२० पैकी ७१८ आणि ७१९ हे उच्च गुण ह्यसांख्यिकीयदृष्ट्या अशक्यह्ण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने काही विशिष्ट विद्यार्थ्यांना मागील दाराने वैद्याकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्यासाठी परीक्षेला उशीर झाल्याचे कारण दाखवत वाढीव गुण देणे हा अप्रामाणिक प्रकार होता असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.
तेलंगणचे अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि आंध्र प्रदेशचे शेख रोशन मोहिद्दीन यांनी ही याचिका दाखल केली आहे.

नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात ABVP देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलंय. नीटच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची निदर्शने बघायला मिळत आहेत. निकालाची फेर तपासणी करून निकाल परत देण्याची देखील मागणी विद्यार्थ्यांची आहे. यावेळी विद्यार्थी घोषणाबाजी करताना देखील दिसले.

नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. काही विद्यार्थ्यांना 720 पेक्षाही अधिक मार्क पडल्याने हा प्रकार उघडकीस आलाय. यंदा झालेल्या या परीक्षेचा वाद वाढताना दिसतोय. परीक्षेच्या आयोजनावरूनच वादाला सुरुवात झाली होती. परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे विद्यार्थ्यांसह पालकांच्या देखील नजरा लागल्या आहेत.

error: Content is protected !!