सेलू शहरातील मुख्य नाला सफाई करण्याची मागणी

0 58

 

सेलू,दि 17 ःपावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील मुख्य नाल्याची सफाई करून घेण्याची मागणी शिवसैनिक योगेश कथले यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांच्या कडे केली आहे .कार्यालयीन अधीक्षक मलिकार्जुन स्वामी यांनी हे निवेदन स्वीकारले आहे .
शहरातील जिंतूर रोड ,विद्यानगर ,डॉ झाकीर हुसेन नगर ,हेमंत नगर ,शिवाजी नगर ,शाहू नगर मधून स्मशान भूमी कडे जाणाऱ्या या मुख्य नाल्याची साफ सफाई पावसाळ्या पूर्वीच करून घ्यावी .हा नाला पावसाळ्यात पूर्ण पणे भरून वाहतो व यातील घाण व कचऱ्यामुळे यातील पाणी मुख्य रस्याववरून सैरा वैरा वाहते त्यामुळे नागरीकांना त्रास होतो . मुसळधार पाऊस झाला की या नाल्यात पाणी मावत नाही व ते विद्यानागर, डॉ झाकीर हुसेन नगर,हेमंत नगर ,शिवाजी नगर व शाहू नगर मधील लोकवस्तीत शिरते व त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान होते .व या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराई ची भीती निर्माण होते .
तरी अडचणींना तोंड देण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये यासाठी त्वरित या मुख्य नाल्याची साफसफाई करून घ्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

error: Content is protected !!