देवगिरी ग्लोबल अकॅडेमीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
परभणी,दि 14 ः
येथील देवगिरी ग्लोबल अकॅडेमीचे १० वे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार (दि.13) उत्साहात व जल्लोषात पार पडले.
या स्नेहसंमेलनाची संकल्पना “महाराष्ट्राची लोकधारा” यावर आधारलेली होती शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतच्या गुणांना वाव देत प्रेक्षकांना महाराष्ट्राचे अनुपम दर्शन घडविले व प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, त्यांच्या सौभाग्यवती ज्योत्सना काळे. तसेच श्री. शिवाजीराव नखाते (शालेय व्यवस्थापन अध्यक्ष) सौ. भावनाताई नखाते (राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्ष परभणी) डॉ. कश्मिरा टेकाळे , सौ. अश्विनी देशमुख,डॉ. जयश्री यादव, डॉ. अर्चना सोमाणी आणि डॉ. अर्चना ढमढेरे यांची उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांस मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे प्राचार्य श्री. नितीन खिस्ते यांंनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन करून शाळेचा वार्षिक अहवाल थोडक्यात मांडला.
या शुभ प्रसंगी विविध शालेय स्पर्धेत यश संपादन करून वर्षभर शालेय शिस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यास वार्षिक आर्दश पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात उत्कृष्ट सुत्रसंचलन व उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या गटास सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून सौ. सुनंदा डीघोळकर व सौ. विजया कातकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.शाळेतील समन्वयिका सौ. मेघा सूर्यवंशी (मोरे) यांनी सर्व उपस्थित प्रेक्षकगण व मान्यवरांचे आभार मानले.