वनसगाव येथे धर्मनाथ बीज महोत्सवाची सांगता

0 20

रामभाऊ आवारे निफाड
परमेश्वराचे मनुष्यावर अगणित उपकार असून परमेश्वराने मानवाला सुंदर नरदेह दिला आहे त्या नरदेहाचा आपल्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी नामस्मरण करणे गरजेचे आहे. नामस्मरण करताना कामात राम करून आपण प्रपंच ही केला पाहिजे.जीवनात ज्यांनी फक्त प्रपंच केला त्याला यम घ्यायला येतोय.प्रपंचासाठी लोक खूप रडतात.जे देवासाठी रडले ते देवाच्या कडेवर गेले.जीवन सार्थक होण्यासाठी प्रपंच बरोबर परमार्थ केला तर निश्चितच देव घ्यायला येईल असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र गोरक्ष नगर गोरक्षनाथ मंदिर कारवाडी वनसगाव येथे आयोजित  धर्मनाथ बीज महोत्सव कार्यक्रमात ते काल्याच्या कीर्तनात जीवा – शिवाच ऐक्य सांगणाऱ्या कीर्तनातून निरुपण करतांना बोलत होते.
श्रीकृष्णाच्या अगाध लीलांचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाचे मुळ नवनारायण असुन जोपर्यंत साधुसंतांचा सन्मान आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहतील. साधुसंतांचा सन्मान केला तर सुखाची प्राप्ती होते. तुम्ही जेवढं प्रेम द्याल त्यापेक्षा अधिक प्रेम तुम्हाला समाजाकडून मिळेल यासाठी आपण निःस्वार्थ पणाने परमार्थ करताना सामाजिक कार्यातही आपलं योगदान देणे महत्त्वाचे आहे. मनुष्याला देव ओळखता आला पाहिजे परंतु समाजात काही लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत ही देव ओळखता आला नाही म्हणून त्यांचा जन्म वाया गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कीर्तनाच्या सांगता प्रसंगी दहीहंडीचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित ओम चैतन्य कानिफनाथ आश्रमाचे मठाधिपती अण्णा बाबा शिंदे, काल्याचे कीर्तनकार धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव, भुताने येथील नाथ भक्त तान्हाजी आहेर, उंबरखेड येथील समर्थ सद्गुरु सदाशिवनाथ महाराज निफाड तालुका अध्यक्ष निवृत्ती महाराज आथरे, महाप्रसादाचे आयोजक रामदास यशवंत डुंबरे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार डॉ योगेश डुंबरे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही  सत्कार करण्यात आला.
तसेच गोरक्षनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने भव्य दिव्य कमान करून दिल्याबद्दल ट्रेकर्स ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून मनेष कुमार विठ्ठलराव शिंदे या धर्मनाथ बीज सोहळ्यात चारही दिवस पंगत देणारे सर्वश्री रंगनाथ हरिभाऊ शिंदे ,विश्वनाथ शंकर कापडी, अशोक माधवराव ढोमसे तसेच राम लखन मंडप चे संचालक ,आचारी समीर पठाण आदींचा यावेळी अण्णा बाबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच  मृदंग वादक ओंकार महाराज रायते गायनाची साथ देणारे ऋषिकेश महाराज नवले, नवनाथ महाराज बत्तासे, प्रशांत महाराज रायते ,भास्कर अप्पा गारे, केशव आप्पा रायते, संजय महाराज काळे, काकडा सम्राट गोटीराम बाबा मांडवडकर, विणेकरी गणपत बाबा लगड आदींचा सप्ताह कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी अशोकराव गारे, बाळासाहेब शिरसाठ, आबा ढोमसे, नवनाथ माऊली बोरगुडे ,शंकरराव कोल्हे, शंकरराव भवर, पार्थ सूर्यवंशी निवृत्ती महाराज आथरे, ट्रेकर्स ग्रुपचे सर्व सदस्य, जयराम बाबा खानगाव, राजेंद्र शिंदे सर, हभप उत्तमराव शिंदे, भाऊराव शिंदे,भुषण शिंदे, रघुनाथ शिंदे, लक्ष्मण आण्णा शिंदे, शिवाजी दादा शिंदे,गोपाळ मामा शिंदे,दत्तु मामा शिंदे, सरपंच महेश केदारे ,टी जी शिंदे , सचिन शिंदे, डॉ योगेश डुंबरे, श्रीमती शितल जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे सर यांनी मानले.

error: Content is protected !!