श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे संगीत भक्ती रंग कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध

0 84

परभणी,दि 24 ः
श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे देवजन्मोत्सव निमित्त संगीत भक्ती रंग कार्यक्रमात अभंग, भक्तिगीते व गौळणी म्हणत गायक व वादकांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
परभणी येथील प्रफ्फुल शहाणे आणि संच यांनी सादर केलेल्या या संगीत कार्यक्रमात अनुष्का शहाणे, सौम्या घोडके , विदिता उडानशिव, आर्या डागा , हर्षदा शहाणे , बालगायीका स्वरा पाथरकर, विजय डागा, प्रफुल्ल शहाणे, श्यामसुंदर शहाणे, शुभम बोरकर, आबासाहेब वाघ या गायकांनी विविध रचना सादर केल्या. तर साथसंगत देण्यासाठी अरविंद शहाणे, ज्ञानेश्वर पाथरकर, प्रफुल्ल शहाणे, विजय डागा, प्रथमेश शहाणे, हरीश शहाणे, कैवल्य टाक यांचा समावेश होता.
बाल गायक कलावंतांनी गायलेले अभंग गवळणीला उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रात्री दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात सुंदरते ध्यान उभे विटेवरी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खेळ मांडीयेला वाळवंटी घाई , कधी लागेल रे वेड्या गोडी तुला अभंगाची, कैलास के निवासी , निजरूप दाखवा हो, सुखाचे ते सुख चंद्रभागेतठी तर गवळणी मध्ये घागर घेऊन निघाली पाण्या गवळण , दही दूध लोणी घागर घेउनी, वृंदावनी वेणू , राधे राधे कान्हा किती दिसतो गोजिरवाणा अशा अनेक अभंग व गौळणीच्या रचना सादर सादर केल्या. वाचे विठ्ठल गाईन ही रचना स्वरा पाथरकर या चिमुकलीने सादर करताच उपस्थित त्यांनी मोठी दाद दिली. अनुष्का शहाणे या गायिकेचे रसिकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले तर दत्तराव वाघ यांनी आभार मानले.

error: Content is protected !!