शेतकऱ्यांच्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार-आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

0 18

(प्रतिनिधी) :-
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पूर्णा तालुक्यास अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी, हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त घटकांना भरघोस आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनवेळी विधानसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडू, असे आश्वासन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी नुकसानग्रस्तांना दिले आहे.‌ याप्रसंगी आ.डॉ.गुट्टेंना पाहून अनेक शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला.

अवकाळी व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते पूर्णा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना बोलले. नुकसान समजून घेतले. शेतकऱ्यांना धीर दिला. त्यामध्ये धानोरा काळे, ताडकळस, खुजडा, आवई, फुकटगाव, सुहागण, गौर, चुडावा, पिंपळगाव (लो), लोण खुर्द आणि पांगरा लासीना या गावांचा समावेश आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पिक व पशु नुकसान, घरांची गोठ्यांची पडझड केली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतात आणि डोळ्यात सुध्दा पाणी आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे फळबागास एकरी दहा लाख व बागायती क्षेत्रास सात लाख आणि कोरडवाहू शेतीस सुध्दा भरघोस मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आवर्जून म्हटले आहे.

यावेळी रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, तहसीलदार माधवराव बोथीकर, गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड, तालुका कृषी अधिकारी निलेश अडसुळे, कृषी सहाय्यक छाया लोखंडे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेश कदम, पूर्णा प्रभारी सुभाष देसाई, सरपंच उत्तमराव ढोणे, बाळासाहेब कदम, शिवाजी अवरगंड, मारोती मोहिते, दत्तराव पौळ, इस्माईल शेख, विकास घाते, सरपंच दिनेश दुधाटे, अनंतराव पारवे, गीताराम देसाई, शरद जोगदंड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!