स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाचे पंख देणारे लांडे साहेब-प्राचार्य डॉ. के जी कानडे यांचे प्रतिपादन

0 46

 

पुणे – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी, पुणे येथील स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये यूपीएससी, एमपीएससी आणि आयबीपीएस बँकिंग मार्गदर्शन केंद्राचे आज माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. रुपेश गोळे त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विलास लांडे साहेब ( प्रथम आमदार भोसरी विधानसभा मतदार संघ ), विश्वस्त मा श्री. विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी कानडे उपप्राचार्य प्रा .किरण चौधरी , प्रबंधिका सौ .आश्वीनी भोसले चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अस्मिता गोरडे व शितल गायकवाड आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले . ते म्हणाले की , अलीकडच्या काळात सर्वच विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे आकर्षण आहे परंतु या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अपयशाला सामोरे जावे लागते . त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो .

 

 

परंतू या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे पंख या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष विलासराव लांडेसाहेब…यांनी दिलेले आहे त्यामुळे महाविद्यालतील विद्यार्थी यशाला नक्की गवसणी घालतील, अशी आशा व्यक्ती केली.
महाविद्यालयातीलच नव्हे तर पुणे, पिंपरी-चिंचवड व भोसरी परिसरातील सर्व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अद्यावत सुविधायुक्त यूपीएससी, एमपीएससी आणि आयबीपीएस बँकिंग इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विलासशेठ लांडे साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू केले आहे . या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञ व अनुभवी व्याख्यात्यांचे मार्गदर्शन (ऑफलाइन व ऑनलाइन), तसेच अद्यावत अभ्यासिका व सर्व उपयुक्त पुस्तके इत्यादी महत्वाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत . सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन साहेबांनी केले आहे.

 

 

माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. रुपेश गोळे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिल गंभीरे , इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. कमलेश जगताप, प्रा . सुनिल दांडेकर, मराठी विभागाचे प्रा . सुमित उबाळे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .जी कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. दीपक पावडे, सहसमन्वयक प्रा.अजिंक्य पडलवार व प्रा.पूजा सांडभोर तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले . उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुग्रीव आडाल यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पावडे यांनी केले .

error: Content is protected !!