राष्ट्रवादीच्या गृहभेटींना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

0 39

 

सेलू / नारायण पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP)शहरातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरात दि २१ जून रोजी समुह गृह बैठकांचे आयोजन केले होते.
यावेळी जिंतूर -सेलू मतदार संघाचे माजी आमदार मा. विजयरावजी भांबळे साहेब यांच्या समवेत सर्व गृह भेटी घेण्यात आल्या . सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत या गृहभेटी चालू होत्या .

 

यामध्ये गायत्री नगर, सरोदे नगर, पारिजात कॉलनी, श्रीराम कॉलनी, मारोती नगर, विद्या नगर, गणेश नगर, सह्याद्री नगर, राम राजे नगर, अहिल्याबाई होळकर नगर, आणि जिंतूर कॉलनी या नगरांमध्ये काल बैठका आणि गृहभेटी संपन्न झाल्या..!
लोकांचा मिळणारा उत्सुर्त प्रतिसाद आणि आदरातिथ्य आम्हाला बळ देणारे होते. येत्या रविवारपासून प्रत्येक रविवारी मा.विजयरावजी भांबळे साहेब फक्त सेलू शहरासाठी वेळ देणार आहेत. यावेळी शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत राहणार आहेत . अशी माहिती जी प चे माजी सभापती अशोकराव काकडे यांनी दिली आहे .

error: Content is protected !!