प्रत्येकाने आपल्या जीवनात पैसा आणि आरोग्य यांचा समतोल राखणे गरजेचे’- डॉ. योगेश डुंबरे

गुरुकुल विभागांतर्गत विद्यालयाची द्वितीय गुरुकुल भेट संपन्न

0 33

निफाड / रामभाऊ आवारे – वनसगांव तालुका निफाड येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार गुरुकुल प्रकल्प अंतर्गत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था नियोजनाप्रमाणे क्षेत्रभेट आयोजित केली जाते. चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील गुरूकुल क्षेत्रभेट क्रमांक- २ एचडीएफसी बँक, वनसगाव व रामविजय क्लिनिक अँड पॅरालिसिस केअर सेंटर, वनसगाव येथे आयोजित करण्यात आली होती.विद्यालयाचे प्राचार्य रोटे सी.डी.सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण यांच्या सहकार्याने गुरुकुल क्षेत्रभेट आयोजन प्रमुख आनंदा आहिरे यांनी क्षेत्रभेटीचे आयोजन केले.

 

क्षेत्रभेटीस राम विजय क्लिनिकचे संचालक मा.डॉ. श्री.योगेशजी डुंबरे, एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक पाठक साहेब,स्कूल कमेटी ज्येष्ठ सदस्य शिवाजीनाना शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य रोटे सी.डी व पर्यवेक्षक दरेकर के.बी, गुरुकुल विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण , गुरुकुल क्षेत्र भेट प्रमुख आनंदा आहिरे , माता- पालक संघाच्या सचिव सौ.उमा चव्हाण, इ. दहावी ब चे वर्गशिक्षक अरविंद वसावे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपक गायकवाड इ. आठवी स्कॉलरशिप प्रमुख भाऊसाहेब बोरसे यांनी विशेष सहकार्य केले.या प्रसंगी इ. पाचवी ते दहावी चे सर्व गुरुकुल सहभागी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. माननीय व्यवस्थापक साहेब तसेच माननीय संचालक साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन माननीय प्राचार्य व पर्यवेक्षक यांनी स्वागत केले.

 

 

HDFC Bank वनसगाव- एचडीएफसी बँकेविषयी शाखेचे व्यवस्थापक मा.श्री. सुबोधजी पाठक साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बँकेच्या विविध सुविधा याबद्दल माहिती दिली. संपूर्ण भारत देशामध्ये एचडीएफसी बँकेचे 9000 शाखा आहेत. बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. सेविंग खाते, करंट खाते, विविध कर्ज योजना व त्यांचे कालावधी आणि व्याजदर याविषयी माहिती दिली. त्याबरोबरच पैशाची बचत करणे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वरील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी अहवाल नोंदवहीत नोंद केली.

 

 

रामविजय क्लिनिक अँन्ड पॅरालिसीस केअर सेंटर- केशवाहिन्यांच्या गुंतागुंती मुळे पॅरिलिसीस होणाऱ्या रुग्णांची रामविजय क्लिनिक अँन्ड पॅरालिसीस केअर सेंटर व्दारा अत्यंत अल्प दरात अनेक वर्षांपासून आरोग्य सेवा देण्यात येत आहे. पैसा आणि आरोग्य याचा समतोल राखण्याचा सल्ला राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर चे संचालक डॉ.योगेशजी डुंबरे यांनी रुग्णांचे पालक, कर्मचारी वर्ग, आणि विद्यार्थ्यांना दिला.सर्वांचे मनोगत झाल्यानंतर माननीय संचालक व व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांना दवाखाना व बँक पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. आर्थिक व्यवहार तसेच उपचार पद्धती याविषयी माहिती सांगताना डॉ.योगेशजी डुंबरे यांनी रुग्णांची अवस्था,लक्षणे, घ्यावयाची काळजी या बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेथील कर्मचारी सेवकांनी विद्यार्थ्यांना माहिती समजावून सांगितली.
क्षेत्रभेटीच्या अंती विद्यालयाचे जेष्ठ गणित शिक्षक व गुरूकुल प्रमुख अर्जुन चव्हाण यांनी मान्यवरांचे व विद्यालयास बातमी वृत्तांकन सेवा देणारे केंद्रीय पत्रकार संघाचे संघटक रामभाऊ आवारे सर यांचे आभार मानले.

error: Content is protected !!