आर्थिक साक्षरतेचे धडे विद्यार्थ्यांना शालेय वयात मिळणे गरजेचे-सुनील हट्टेकर
सेलू / नारायण पाटील – विद्यार्थीनीनी काळाची गरज ओळखता डिजिटल आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजून घेता बचतीची सवय अंगीकारून गुंतवणुकीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन आर्थिक साक्षरता सल्लागार प्रमुख सुनील हट्टेकर यांनी केले.
नूतन कन्या प्रशाला सेलू येथे आर्थिक साक्षरता काळाची गरज या विषयावर आयोजित आणि स्वच्छ शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारणी सदस्य दत्तरावजी पावडे,प्रमुख अतिथी आर्थिक सल्लागार परभणी प्रमुख सुनील हट्टेकर, स्टेट बँक ऑफ इंडिया सेलू शाखाप्रमुख पाटील, प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने झाली. भविष्यात करावयाची बचत, गुंतवणूक,गुंतवणुकीतील संभाव्य फसवेगिरी यासंदर्भात मार्गदर्शन करताना हट्टेकर म्हणाले की विद्यार्थिनींनी बालवयापासून आर्थिक साक्षरतेचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे.
श्री पाटील यांनी मार्गदर्शन करताना, बँकेचे व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप दत्तरावजी पावडे यांनी केला तर सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी आभार भालचंद्र गांजापुरकर यांनी मानले . याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.