डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यासाठी रमाईंचा संघर्ष व बलिदान प्रेरणादायी

शिक्रापूर (पुणे) येथील हळदी कुंकू कार्यक्रमात तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या डॉ आम्रपाली पुणेकर यांचे प्रतिपादन

0 122

निफाड / रामभाऊ आवारे – रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगले होतं. जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरीर पोखरून गेलं होतं. त्यांना आजार बळावला होता. रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान हे खूप मोठं आहे.रमाई माता नसती तर डॉ बाबासाहेब आंबेडकर घडले नसते.आणि ते घडले नसते तर आज आपण हळदी कुंकू सारखे सामाजिक उपक्रम राबविले नसते. रमाबाई एक आदर्श व्यक्तिमत्व होती त्यांचा आदर्श घेऊनच सर्वांनी मार्गक्रमण करावे अशी प्रतिपादन पुणे येथील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या डॉ आम्रपाली पुणेकर यांनी केले.
शिक्रापूर पुणे येथे रणरागिनी बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ माँसाहेब, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व आदर्श माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसुमताई मांढरे जिल्हा परिषद सदस्य शिक्रापूर होत्या तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ आम्रपाली पुणेकर सामाजिक कार्यकर्त्या तृतीय पंथ, सीमाताई कुटे आम आदमी पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, पूजा भुजबळ ग्रामपंचायत सदस्य शिक्रापूर, पल्लवी ताई हिवरे बीजेपी ओबीसी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शिरूर,कविता जकाते मानवाधिकार संघटक,अंजली लोखंडे आम आदमी पक्ष ,रमा आठवले रणरागिणी महिला बचत गट अध्यक्ष,रीना सोनवणे सचिव संगीता तावरे मार्गदर्शक ,छाया कळमकर राणी डोंगरी ह्या मजेत गट सदस्य आदी होत्या.

 

यावेळी सरस्वतीला न पूजता रमाई जिजाऊ सावित्रीला
प्रत्येक महिलेने पूजले पाहिजे असे मत सौ पूजा भुजबळ यांनी महिलांना पटवून दिले तसेच सरकार कुणाचेही असो पण प्रत्येक सरकारी योजनेचा प्रत्येक महिलांनी लाभ घ्यावा असे ही आवाहन यावेळी करण्यात आले.

 

रणरागिणी बचत गटाच्या माध्यमातून हळदी कुंकूंवाचा
असा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन समाजात नवीन आदर्श निर्माण केल्याबद्दल रणरागिनी बचत गट अध्यक्षा सौ रमाताई आठवले,सौ रीनाताई राजेंद्र सोनवणे, संगीताताई तावरे यांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.आपले कार्य असेच पुढे वाढत जावो अशा सर्वांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी अश्विनी जाधव , रुपाली ढमढेरे, दिपाली मगर ,रेणुका शिंदे, माधवी कांबळे, प्रियंका पडसाळकर,मनीषा डोके,जया पाटील, ज्योती काकडे, करुणा कांबळे व सर्व रणरागिनी महिला बचत गट सदस्य व सर्व महिला मंडळ शिक्रापूर,अनिता हरगुडे,वंदना जकाते ,रूपाली कोलते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊसाहेब कोकडे यांनी केले तर आभार रणरागिणी बचत गटाच्या अध्यक्षा सौ रमाताई आठवले यांनी केले.

error: Content is protected !!