गोर सेनेने परभणीत काढला विराट आक्रोश मोर्चा

0 89

परभणी,दि 30 (प्रतिनिधी)ः सोनपेठ तालुक्यातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी गोर सेनेच्या संतप्त हजारो पुरुष व महिलांनी गुरुवारी (दि.30) दुपारी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आक्रोश आंदोलन करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ तांडा येथील 16 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अन्याय,अत्याचार विरोधातील त्या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा झालीचं पाहिजे,तसेच सदरील प्रकरण हे फास्टट्रॅक मध्ये चालवून सरकारी वकील म्हणून अँड..उज्जवल निकम यांची नेमणूक करावी,या प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व वीस लाख रुपयाचे अनुदान तात्काळ मंजूर करावे,पीडितेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षक द्यावे,यासह आदी मागण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेञत्वाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गोर सेनेचे प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण,उपाध्यक्ष अशोक चव्हाण,विभागीय अध्यक्ष निळू पवार,निलाकांत जाधव,जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,देविदास राठोड,बबलू जाधव,रवीभाऊ चव्हाण,सतीश पवार,प्रकाश राठोड आदी तमाम गोर सेनेच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
अशा प्रकाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून विशेष करून गोर बंजारा समाजासह इतर समाजामध्ये सातत्याने घडत असून देखील आतापर्यंत एकही घटनेत पीडितेला न्याय मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. तमाम महाराष्ट्रामध्ये झालेल्या पीडितेवरील अन्याय ज्यामध्ये औरंगाबाद मधील सीमा राठोड,किनवट मधील सुरेखा राठोड,बीड मधील पूजा चव्हाण,वडवणीतील स्वाती राठोड,नाशिक मधील नांदूर नाका व मुंबई येथील साकीनाका प्रकरण या अशा प्रकारच्या वारंवार बलात्करांच्या घटना दिवसेंदिवस घडल्यानंतरही त्यां पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नसल्याने प्रकर्षाने दिसून येत आहे.असेही नमूद केले.

मौजे डिघोळ तांडा येथील अल्पवयीन मुलीसह राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात राज्य सरकारने संबंधित आरोपींविरोधात कठोर भूमिका घ्याव्यात संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करावा अन्यथा येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका ठिकाणी गौर सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गौरव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  चव्हाण यांनी याप्रसंगी दिला. आजच्या आक्रोश मोर्चात आजपर्यंत अन्याय,अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबातील व्यक्तींना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला.
या मोर्चाला संपूर्ण जिल्हातुन विविध संघटनाचे पदाधिकारी,नेते,आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,नगरसेवक विविध सामाजिक संघटना यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होते. गोर-सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संपत चव्हाण यांनी या आंदोलनातचे नेतृत्व केले.या मोर्चाचे प्रास्तविक परभणी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय अध्यक्ष निळू पवार यांनी केले.

error: Content is protected !!