देवरगाव विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

0 186

 निफाड,दि 12 ः
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या देवरगाव येथील योगिराज हरेकृष्ण विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीप सावंत होते,व्यासपीठावर बाळकृष्ण महाले,श्यामराव पगार, वेणुनाथ गायकवाड, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
सानिका क्षीरसागर या विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊ चीं वेशभूषा केली तर शिवानी क्षीरसागर हिने स्वामी विवेकानंद यांची.केलेली वेशभूषा आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.प्रतिक्षा शिंदे या विद्यार्थीनीने ‘मी जिजाऊ बोलते’ ही एकपात्री नाटिका सादर केली.
ओम शिंदे, शिवराज शिंदे,यश वाघाडे,संचिता शिंदे,वैष्णवी हांडे,प्रतिक्षा शिंदे,सानिका गटकळ,स्वामिनी भवर या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची ओळख आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
शिक्षक मनोगतात विद्यालयाचे श्यामराव पगार यांनी मातेने ठरवले तर मुलांना ती आपल्या मनाप्रमाणे घडवू शकते त्यांना आकार देऊ शकते अशाच एका युगकर्त्या राजाच्या रूपाला आकार देऊन घडविणारी माता होती राजमाता जिजाऊ. इतिहासात अनेक दैदिप्यमान महिला होऊन गेल्या. त्यापैकी अनेकांनी इतिहास घडवला तर काहींनी इतिहास निर्माण करणारे युगपुरुष घडवले अशाच काही कर्तुत्ववान महिलांपैकी अग्रस्थानी आहेत राजमाता जिजाऊ सूर्योदय म्हणजे अंधाराचा लोप आणि प्रकाशाचा उदय अशा सूर्योदयासमयी ज्यांचा जन्म होतो त्यांच्या कर्तृत्वाचा गुणांचा प्रकाश अवघे आयुष्य उजळून टाकतो. अशाच एका प्रकाशमान स्त्रीचा जन्म सूर्योदयी झाला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी घडविले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. तसेच आज स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारे स्वामी विवेकानंद .स्वामी विवेकानंद हे साहित्य ,तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे विद्वान होते. स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे. ज्यांचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची गाथा सांगते. स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी अध्यात्मिक,धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धती शिकवले ते नेहमी कर्तुत्वावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी चे विद्यार्थी आयुष कुरणे व प्रणव शिंदे यांनी केले.कार्यक्रमास निर्मला खांगळ, संगीता गांगुर्डे, राहुल दाते,संजय जाधव, तात्यासाहेब बोरसे, दत्तु ठोंबरे,नवल देवरे,यशवंत चौधरी,स्वप्निल ठाकरे, दीपक जेऊघाले,गोविंद डुकरे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!