प्रशासनाकडून यात्रा महोत्सव निमित्त संबंधित विभागाला मार्गदर्शक सूचना

0 331

सेलू – ३० नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या शिर्डीचे संत साईबाबा चे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा महान यात्रा महोत्सव सुरू होत आहे .हा महोत्सव व्यवस्थित व सुरळीत पार पडावा याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत .
उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या आदेशानुसार तहसीलदार झांपले यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे अधिकारी व यात्रा समितीचे सदस्य यांची एक बैठक आज दि २१ रोजी आयोजित करण्यात आली होती .
यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर , न प चे मुख्यधिकारी देविदास जाधव ,महावितरण चे शहर अभियंता प्रवीण थोरात ,पोलीस प्रशासनाकडून संजय सानप यांची उपस्थिती होती .
यावेळी मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक,वामन मंडलिक ,सुधीर मंडलिक तसेच मोहन खापरखुंटीकर,बंडू देवधर ,मनोज दिक्षित ,कृष्णा काटे ,जी बी जोशी ,भागवत पाटील ,विलास खिस्ते ,कृष्णा इरमले आदींची उपस्थिती होती .
यात्रेत येणाऱ्या संभाव्य अडचणी यावेळी सांगण्यात आल्या .यामध्ये प्रामुख्याने यात्रेच्या जागेची सफाई ,विजेची लोडशेडिंग व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त आदींचा समावेश होता .
या समस्या होऊ नयेत याची संबंधित विभागाने दखल यात्रा महोसव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी काळजी घ्यावी असे आदेश तहसीलदार साहेबांनी सर्वांना दिले .
यात्रा सुरू होण्यापूर्वी या भागातील रस्यावर पडलेले बांधकाम साहित्य व बॅनर हटवून सर्व परिसर स्वच्छ व मोकळा करावा असे आदेश न प ला देण्यात आले आहेत .तसेच या यात्रा कालावधीत तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणार नाही व कोणतीही दुर्घटना होणार नाही .याची दक्षता महावितरण ने घ्यावी .तसेच यात्रा कालावधीत यात्रा ,मंदिर परिसर व पालखी मिरवणूक मधे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व शांतपणे हा यात्रा महोत्सव पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी .असे आदेश यावेळी तहसीलदार दिनेश झांपले यांनी यावेळी दिले आहेत .

error: Content is protected !!