गुरुजींनी केली शिक्षा, 10 वीचा विद्यार्थी दप्तरातून बंदूक घेऊनच आला!

0 16

 

 शाळेत आपल्याला झालेल्या शिक्षेच्या दुसऱ्याच दिवशी हा मुलगा कट्टा घेऊन अखेर शाळेत दाखल झाला. या कट्ट्याच्या माध्यमातून शिक्षा करणाऱ्या शिक्षकाला धमकावण्याचा त्याचा इरादा होता. पोलिसांनी केलेल्या तपासात या मुलाने हा अवैध देसी कट्टा कुणाकडून तरी खरेदी केला होता, हे समोर आलंय.

एका दहावीतील विद्यार्थ्याच्या दप्तदामध्ये चक्क बंदूक आढळून आली. यामुळे संपूर्ण शाळेत  एकच खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील एका गावातील आहे. सोराव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये असलेल्या एका गावात दहावीतील विद्यार्थी अवैध देशी कट्टा घेऊन शाळेत पोहोचला होता. दत्परात त्याने ही बंदूक लपवून आणली होती. पण शाळेत चेकींगच्या दरम्यान, हा विद्यार्थी पकडला गेला. यानंतर विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने पोलीस (Police) स्थानकात नेलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या मुलाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय. नेमकं या मुलाकडे बंदूक आली कुठून, याचा तपासही केला जातोय. आता या प्रकरणी अल्पवयीन दहावीतील विद्यार्थ्यावर नेमकी काय कारवाई केली जाते? हे पाहणं महत्त्वाचंय. पण दुसरीकडे विद्यार्थ्यांना कोणतीही शिक्षा करण्याआधी शिक्षकही आता कमालीचे धास्तावलेत.

विद्यार्थ्याकडे देसी कट्टा कुठून आला?

15 वर्षांचा दहावीत शिकणारा मुलगा शाळेत आला होता. शाळेत दप्तरांची तपासणी करण्यात आली. या तपसणीदरम्यान, 15 वर्षांच्या दहावीतील विद्यार्थ्याकडे चक्क देशी अवैध कट्टा आढळून आला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शाळा प्रशासनही हादरुन गेलं. या धक्कादायक प्रकारानंतर शाळेतील शिक्षकांनी मुलाला पकडलं आणि थेट पोलीस स्थानकात घेऊन आले.

शिक्षा केली म्हणून मनात राग

स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या मुलाकडे आढळलेल्या कट्टाप्रकरणी पुढील तपास केला जातोय. तर दुसरीकडे या मुलाने असं कृत्य का केलं, यावरुनही परिसरात चर्चांना उधाण आलंय. ज्या मुलाकडे देशी कट्टा आढळला, त्याला एका शिक्षकाने मारलं होतं. सगळ्यांसमोर या विद्यार्थ्याला कोंबडा बनण्याची शिक्षा देण्यात आली होती. यामुळे हा विद्यार्थी प्रचंड नाराज होता आणि त्याचा रागदेखील विद्यार्थ्याच्या मनात धुमसत होतं.

error: Content is protected !!