सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सौ उमा चव्हाण यांचा सन्मान

0 42

निफाड,दि 18 ः रयत शिक्षण संस्था सातारा आयोजित उत्तर विभाग, अहमदनगर यांचे विद्यमाने मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील ‘स्मृती पारितोषिक’ समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अंतर्गत दिला जाणाऱ्या  सावित्रीबाई फुले  पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल वनसगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री) अर्जुन चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.

वनसगाव विद्यालयात आयोजित विविध समित्या व वारकरी मंच च्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे  व विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री) अर्जुन चव्हाण यांना वनसगाव विद्यालयात वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळ शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण सल्लागार समिती स्थानिक स्कूल कमिटी व वारकरी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा जयश्री चव्हाण यांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धनंजय रत्नाकर डुंबरे, शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष मनेष कुमार विठ्ठलराव शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील  शिंदे, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे , विद्यालयाचे पर्यवेक्षक के बी दरेकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नवसे, कुंदन जाधव, अर्जुन चव्हाण , पवार मामा तसेच विद्यालयाची सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक समारंभ दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय, सात्रळ ता. राहुरी जि. अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. रोख ११००० रुपये व स्मृतिचिन्ह तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आमदार आशुतोष दादा काळे, विभागीय अधिकारी अध्यक्ष, सल्लागार समिती रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, अहमदनगर यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे.

error: Content is protected !!