कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरण करा-जिल्हाधिकारी आंचल गोयल

0 127

सुशीलकुमार दळवी
पूर्णा,दि 20 ः
कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरण करा धम्मा सारखा विश्वास लसीकरणावर ठेवा, सर्वांनी एकमत करून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वांनी संकल्प करा असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

पूर्णा येथील बुद्ध विहारात अश्विन पोर्णिमेच्या निमिताने २० ऑक्येबर रोजी  वर्षावास समारोप संघदान सोहळाव धम्मदेशना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, प्रमुख अतिथी म्हणून परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार पल्लवी टेमकर, प्रमुख उपस्थिती भंते शरणानंद महाथेरो, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनंत सुर्यवंशी डॉ. बी.एस. नरवाडे डॉ. संघमित्रा नरवाडे जयप्रकाश गायकवाड, माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, प्राचार्य मोहन मोरे, प्रकाश कांबळे, नगरसेवक उत्तम खंदारे, अॅड धम्मा जोंधळे अॅड हर्षवर्धन गायकवाड, अशोक व्ही कांबळे प्रा.कांबळे मुकूंद पाटील, अशोक धबाले, सुनिल जाधव, सिद्धार्थ भराडे, शामराव जोगदंड, श्रीकांत हिवाळे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी महिलांनी लसीकरणाला न घाबरता सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले .मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही लसीकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी कोविड लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन ही यावेळी करण्यात आले यावेळी धम्मदेशना देतांना भन्ते विनय बोधीप्रिय थेरो म्हणाले की, सर्वांनी कुक्षल कर्म केले पाहिने धम्माचे आचरण श्रध्देने धारण केले पाहिजे प्रत्येकांनी आपल्या मनातील व्देषा मत्सर अहंकार  दुर केला पाहिजे . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपगुप्त महाथेरो यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले

error: Content is protected !!