विवेकानंद विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन

शिवराज्याभिषेक सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली

0 71

सेलू / नारायण पाटील – येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात दि.०६ व ०७ फेब्रुवारी दोन दिवस स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.

 

दिनांक ०६ फेब्रुवारी मंगळवार रोजी बालवाडी ,१ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडास्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल सकाळच्या सत्रात बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.सर्वेश काबरा (सी.ए.)यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यासपीठावर उपेंद्र बेलूरकर ,हरिभाऊ चौधरी ,करुणा कुलकर्णी ,मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.

 

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ.सौ.अनुपमा जवळेकर व डॉ.सौ.अंजली भाबट ( जाधव ) यांची उपस्थिती होती. देवा श्रीगणेशा ,आमच्या पप्पांनी गणपती आणला ,मैं निकला गड्डी ले के ,खंडेरायाच्या लग्नाला ,घुमर गीत ,भगवा रंग, जय जवान जय किसान आदी गीतांवर नृत्य सादर करण्यात आले.रामलीला नाटिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. सूत्रसंचालन स्वप्नाली देवडे व विनोद मंडलिक यांनी केले.

 

 

दिनांक ०७ फेब्रुवारी बुधवार रोजी इयत्ता ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांचे सकाळी बक्षीस वितरण पार पडले.उद्योजक राम नाना खराबे व विमा प्रतिनिधी भारत डख यांची विशेष उपस्थिती होती.सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डॉ.सुबोध माकोडे व डॉ.सौ.हर्षा माकोडे यांची उपस्थिती होती. पहिलं नमन करुनी वंदन ,तू जोगवा वाढ माई ,मराठवाडा गीत ,दिंडी गजर माऊलीचा आम्ही, धनगर,सवारी भवानी चौकामध्ये ,अंबाबाई गोंधळा ये ,मर्द मावळा आदी गीतांवर बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.शिवराज्याभिषेक सोहळ्याने उपस्थितांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले.स्नेहसंमेलन प्रमुख शंकर राऊत व सहप्रमुख दीपाली पवार तसेच सर्व शिक्षक ,कर्मचारी यांनी यशस्वीते साठी प्रयत्न केले.दोन्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता भारतमातेच्या आरतीने झाली.

error: Content is protected !!