हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची किसान कॉंग्रेसची मागणी

0 127

हिंगणघाट प्रतिनिधी (दि०८)
वर्धा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या आशयाचे निवेदन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्फत प्रविण उपासे , अध्यक्ष, वर्धा जिल्हा किसान काँग्रेस यांचे नेतृत्वात देण्यात आले.
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट तालुका, समुद्रपूर तालुका तसेच वरोरा तालुक्यातील काही गावातील नागरिक उपचारासाठी येत असतात परंतु येथे त्या प्रमाणात सोयी उपलब्ध नसल्याने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना नागपूर, सेवाग्राम, सावंगी येथे पाठविले जाते त्यामुळे हिंगणघाट येथील रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा जेणेकरून नागरिकांचा अद्यावत उपचार होईल, ही मागणी सदर निवेदनात केल्या गेली.
याप्रसंगी शालीकराव डेहणे, नरेंद्र चाफले, आशिष डंभारे, शेख इस्माईल, प्रज्वल पाटील हेमंत पोटदुखे, चेतन वैरागडे, पवन कटारे, प्रवीण हरबडे, सचिन पराशर, किशोर महाजन तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!