कुंदन नरेश पाटील तालुक्यातील शिष्यवृत्ती यादीत पहिला

पाचवी व आठवी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर

0 48

 

 

सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.

 

शाळेचा विद्यार्थी कुंदन नरेश पाटील याने घवघवीत यश संपादन करून तालुक्यातील मराठी माध्यम सर्व शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्ती धारक झाला आहे.परभणी जिल्हा शहरी भागातील गुणवत्ता यादीत त्याने ६१ वा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

 

 

शाळेने वर्षभर शिष्यवृत्ती परीक्षेचा एक आगळा वेगळा श्री केशवराज शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न राबवला हे विशेष.

आमचा पाल्य कुंदन हा शिष्यवृत्ती धारक झाला याचा मनस्वी आनंद होत आहे.शाळेने केलेले नियोजन,शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व आम्ही पालक म्हणून दिलेले लक्ष यांचे हे फलित आहे असे कुंदन चे वडील व आई श्री केशवराज बाबासाहेब विदयालयातील शिक्षक सहकारी असलेले नरेश पाटील सर व किर्ती मॅडम यांनी प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त केला.

 

 

या विद्यार्थ्यांना शाळेतील मार्गदर्शक शिक्षक अमिता जवळेकर,सुचिता पितळे,किर्ती कुलकर्णी,मंगेश कुलकर्णी,रूपाली कुर्डे,प्रविण चव्हाण आदींसह शिष्यवृत्ती परीक्षा नियोजन प्रमुख योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

कुंदन च्या या यशाबद्दल त्यांचे व मार्गदर्शक सर्व शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिरूद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी सचिव महेश खारकर आदींसह संचालक अशोक चामणीकर, जयंत दिग्रसकर,अभय सुभेदार, ललित बिनायके,डॉ प्रविण जोग,प्रविण माणकेश्वर,विष्णू शेरे,अॅड किशोर जवळेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!