महाराष्ट्र बंदला आळंदीत समिश्र प्रतिसाद; आळंदी शहर काँग्रेसने मोर्चाकडे फिरवली पाठ
आळंदी, प्रतिनिधी – लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदला आळंदी शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला.राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून लखीमपूर खेरी येथील घटनेचा निषेध केला. यावेळी शहरातील चाकण चौक पासून निषेध मोर्चा सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नगरपरिषद चौक येथे समारोप झाला,यावेळी आळंदी शहरातील काँग्रेस पदाधिकार्यांनी या मोर्चा कडे पाठ फिरवली होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे,राहुल चिताळकर,माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले,शिवसेना शहर प्रमुख अविनाश तापकीर,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे,नगरसेवक प्रकाश कु-हाडे, आनंद मुंगसे,भाऊसाहेब कोळेकर,दिलीप कु-हाडे,उत्तम गोगावले,सतीश कु-हाडे,माऊली गुळुंजकर,सागर रानवडे,राजेश वहीले,नितिन साळुंखे,मनोज पवार,आशिष गोगावले,सिध्देश कु-हाडे,नितिन घुंडरे, निसार सय्यद,अमित डफळ,निखिल तापकीर,संदिप पगडे,अनिकेत डफळ,अरिफ शेख,पुष्पाताई कु-हाडे,रुपाली पानसरे,मंगल हुंडारे,गौरी तापकीर,नियती शिंदे,संगीता पफाळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.