मराठी भाषा पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा

0 36

डहाणू न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त , डहाणू न्यायालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यासाठी डहाणू दिवाणी व फौजदारी न्यायाधीश उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना एच.एन.पोले, दिवाणी न्यायाधीश यांनी केली.ज्ञानेश्चरांनी, ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले.असे सांगून संत साहित्य बद्दल विशेष माहिती दिली.

 

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अनुपमा जाधव, ज्येष्ठ साहित्यिका व उपक्रमशिल शिक्षिका,के.एल.पोंदा.हायस्कूल , डहाणू यांनी मराठी भाषेचा प्रचार , प्रसार व संवर्धन या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले.मराठी भाषेचे जतन करण्यासाठी आपल्या घरातून आधी सुरुवात करावी. अनेक उदाहरणे द्वारा पटवून दिले. ‌आपल्या मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी घराघरात पुस्तके हवीत, तसेच ग्रंथालयायात जाऊन पुस्तके घेतली पाहिजे., वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.त्यांच्या स्वलिखित कवितांचे सुंदर सादरीकरण केले.

 

व मराठी भाषेचा गोडवा, प्रेम, आपुलकी, महत्त्व त्यातून विषद केले.
या कार्यक्रमासाठी डि.एम.गुलाटी , डहाणू व तलासरी वकील संघटनेचे सिनियर वकील भगीरथ पोंदा, अध्यक्ष बि.एल.माचछी, सचिव दिनेश वंजारी,सह सचिव वि.एस.भाले, तसेच मेहेर साहेब,व सर्व वकील सभासद , कोर्टातील मंडळी उपस्थित होती.

 

कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत पवार यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र मराठे यांनी केले.

error: Content is protected !!