परभणीत मराठवाडास्तरीय दोन दिवसीय कर विषयक कार्यशाळा

0 192

परभणी,दि 27 ः
जीएसटी कायद्याला लागू होवून ०६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर परभणी शहरात दि.३० जून व ०१ जुलै रोजी दोन दिवसीय मराठवाडास्तरीय कर विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस मुख्य अतिथी म्हणून डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे चेअरमन सीए.अर्पीत काबरा, परभणीचे भुमिपूत्र जॉईंट कमिश्नर सीजीएसटी नवी मुंबई अरविंद घुगे, जी़ एस़ टी़ पी़ एम़ चे राज्य अध्यक्ष अ‍ॅड.सुनील खुसलानी, आॅल इंडीया टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनचे वेस्टर्न झोनचे अध्यक्ष अ‍ॅड.अश्विन आचार्य, आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष परभणीचे भुमिपूत्र सीए राजेश अग्रवाल (पुणे), महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपादजी बेदरकर, एनएमटीपीएचे अध्यक्ष श्री.अनिल चव्हाण, अ‍ॅड.प्रविण शिंदे, सीए महेश माडखोळकर, अ‍ॅड.विनोद मस्के (मुंबई), सहायक राज्यकर आयुक्त श्री़ धनंजय देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे़
या कार्यशाळेत कर सल्लागार, सीए, डॉक्टर, शेतकरी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात सीए एस.आर. गुंडलवार, सीए एस.आर. गुजराथी, सीए. टी.एम. शहा, कर सल्लागार श्रीवल्लभजी काबरा, अ‍ॅड.अनिलजी टोके, अ‍ॅड.बी.एन. मुंदडा, शेतकरी त्रिंंबकराव लक्ष्मणराव शिंदे (रा.अंगलगाव ता.जि.परभणी), डॉ.उत्तमराव संभाजीराव वानखेडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवरील कर सल्लागार श्री.अशोक गुजराथी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष श्ऱी.राजकुमार भांबरे, सीए संतोष इंगळे यांनी दिली आहे़.
मराठवाड्यातील परभणी सारख्या शहरात प्रथमच आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा अतिशय उत्साहात पार पडल्या नंतर आता द्वितीय कर विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे जी़ एस़ टी़ पी़ एम़ मुंबई, करसल्लागार संघटना परभणी आणि सी़ पी. ़ई़ चॅप्टर परभणी, आॅल इंडीया टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन, हिंगोली कर सल्लागार संघटना, नांदेड कर सल्लागार संघटना, नाशिक कर सल्लागार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेत जीएसटी, आयकर, एस़ एम़ ई़ , टॅली, फायनान्सीअल मार्केटींग आदि विषयांवर पुणे, मुंबई, अहमदनगर, धुळे, नाशिक येथील सीए केदार पांडे (छत्रपती संभाजीनगर), सीए जी.बी. मोदी (धुळे), परभणी निवासी सीए राजेश अग्रवाल (पुणे), सीए रश्मीकुमार शहा (पुणे), सीए प्रसाद भंडारी (अहमदनगर), सीए पार्थ पटेल (मुंबई), सीए आदित्य क्षेत्रीय (नाशिक) आदि तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
परभणी शहरातील उत्सव हॉल, एमआयडीसी, वसमतरोड परभणी या ठिकाणी दि.३० जून व ०१ जुलै रोजी होणाºया या दोन दिवसीय कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन सी़ पी़ ई़ चॅप्टरचे कनव्हेनर सीए संतोष इंगळे, सीए हिमांशू शहा, सीए व्यंकटेश राहुलवार, करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे, उपाध्यक्ष दिलीप जैन, सचिव कुशल गंगवाल, सहसचिव अ‍ॅड.श्रीकांत देशमुख, कोषाध्यक्ष अ‍ॅड.विरेंद्र लाटकर, सीए रोहीत मंत्री, अ‍ॅड.व्यंकटेश भगवतीकर, सत्येन गुंडलवार, संदीप भंडे, निलेश शर्मा आदिंनी केले आहे़

error: Content is protected !!