आमदार समीर कुणावार यांनी विधानसभेत मांडला मृत पावलेल्या जनावरांचा मुद्दा
हिंगणघाट,दि २६ (प्रतिनिधी) ः उमरी येडे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांच्याशी संपर्क साधत गावातील दुधाळ जनावरे तथा बैल व इतर जनावर अचानक मृत पावल्याची माहिती दिली आमदार कुणावार यांनी या फोनची तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना याबाबत माहिती देत पशुसंवर्धन विभागांची चमू घटनास्थळी रवाना करण्याची सुचना केली त्याप्रमाणे संबंधित पथक गावात पोहचून घटने बदलची माहिती घेत होते त्याचवेळी आमदार समीर कुणावार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
शेतकरी आधीच हवालदिल झाला असून अश्या प्रकारे दुधाळ व शेती उपयोगी जनावरे दगावणे हे वेदनादायी असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आमदार कुणावार यांच्या निवेदनावर मा.मंत्री पशुसंवर्धन यांनी तात्काळ दखल घेत दुपारी ३.०० वाजता मंत्रालयात बैठक बोलावली सदर बैठक मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तथा आमदार समीर कुणावार , पशुसंवर्धन विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव, आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत उमरी येडे येथे आलेला जनावरा वरील रोग हा इतरत्र पसरू नये या करीता खबरदारी घ्यावी त्याच प्रमाणे लवकर लवकर गावातील इतर जनावरांची तपासणी करून त्यांना वेळीच औषधोपचार करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या तसेच मुंबई व नागपुरातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दौरा करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.त्याचप्रमाणे जनावरावरील लशीकरण हे बहुतेकदा कागदोपत्री राबविल्या जात असल्याने पाहिजे त्याप्रमाणे लशीकरण होत नसल्याने त्यावर एक SOP घोषित करण्याची मागणी केली जेणेकरून शासनापर्यंत योग्य ती माहिती पोहचेल तसेच वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकर लवकर भरण्याची मागणी सुध्दा यावेळी करण्यात आली असून मा.मंत्री महोदयांनी यावर सकारात्मकता दर्शविली असून लवकरच रिक्त पदे भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत. आमदार कुणावार यांनी तातडीने याप्रकरणाची दखल घेतल्यामुळे उमरी गावात पशुसंवर्धन विभागाची चमू दाखल होत जनावरावरील उपचार औषधोपचाराची अंमलबजावणी झाल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त करीत आमदार कुणावार यांचे आभार मानले.