नूतनचे क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांना ऑलिम्पियन पुरस्कार प्रदान

0 36

सेलू, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघ व धुळेव नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व हस्ती पब्लिक स्कुल दोंडाईचा यांच्या वतीने दि. 20 मार्च रोजी दोंडाईचा जि. धुळे, येथे नूतन विद्यालय सेलू क्रीडा शिक्षक तथा राज्य सचिव टेनिसव्हॉलीबॉल गणेश माळवे व सौ. छाया माळवे यांना ऑलिम्पियन पुरस्कार अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी क्रीडा विभाग राज्य सहाय्यक संचालक चंद्रकांत कांबळे, उद्योजक अशोक जैन, राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, क्रीडा उपसंचालक सौ.सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, प्रो.कबड्डी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र राजपूत, आनंद पवार, राजेश जाधव शिवदत्त ढवळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेश माळवे हे 27 वर्षांपासून नूतन विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडू घडवले आहे. यांस सोबत टेनिसव्हॉलीबॉल खेळांचा राज्य व राष्ट्रीय स्तर प्रसार व प्रचार करत राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. टेबल टेनिस, या खेळाचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत.
याबद्दल गणेश माळवे यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव डॉ. व्हि.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे,माजी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हाक्रीडाधिकारी नरेंद्र पवार, प्राचार्य डॉ. महेंद्र शिंदेमुख्याध्यापक नारायण सोळंके,सौ. संगिता खराबे,प्रा.नागेश कान्हेकर, डी.डी.सोन्नेकर, सतिश नावाडे,दिलीप सुरवसे, प्रशांत नाईक, किशोर ढोके,अनिल महाले, सुनील महाले,संजय महाले आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .

error: Content is protected !!