एनएमएमएस शिष्यवर्ती परीक्षेत वाघाळा जिल्हा परिषद शाळेचे नऊ विद्यार्थी चमकले

0 15

पाथरी / प्रतिनिधी – एनएमएमएस शिष्यवर्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून वाघाळा जि.प.शाळेतील ९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

वाघाळा जि.प . शाळेत शिक्षण घेत असलेल्या कोमल मुंडे,अनुष्का शेटे,गायत्री ठोंबरे,श्रद्धा सोळंके,गायत्री घुंबरे,अर्चना तिडके,मोहिनी नागरगोजे, या विदयार्थ्यांनीसह अधिराज घुंबरे,श्रीमद् घुंबरे हे विद्यार्थी परिक्षेत उतीर्ण होत शिष्यवृती साठी पात्र झाले आहेत . शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात यशस्वी विदयार्थी व त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला . विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक यू. जी. स्वामी , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागोराव घुंबरे ,सरपंच बंटी पाटील ,चेअरमन गणेश पाटील यांनी स्वागत केले आहे . या विद्यार्थ्यांना शिक्षक शंकर धावारे,संदीप सूत्रावे,अरविंद जाधव ,श्रीनिवास कासले यांच्यासह वाघाळा जि.प . शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.

error: Content is protected !!