झेंडावंदनाला जाताना रील बनवणं जीवावर, एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

0 488

परभणी, प्रतिनिधी – दुचाकीवर रील तयार करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे. परभणीमध्ये झेंडावंदनला एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला. (parbhani accident news) यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.

 

चालत्या दुचाकीवर व्हिडिओ करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरील चारही मुलं नववी इयत्तेत शिकत आहेत. पाथरी-सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर हा अपघात घडला. शंतनु सोनवणे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर स्वप्निल चव्हाण, योगानंद घुगे, राहुल महादू अशी जखमी मुलांची नावे आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

परभणीच्या पाथरी सोनपेठ मार्गावर आज सकाळी शाळेत झेंडावंदनासाठी जाणाऱ्या नववीच्या चार विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला. ज्यात 4 ही जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर या 4 जणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हे चार जण शाळेकडे जात असताना पाथरी सोनपेठ मार्गावर चक्क रील बनवत होते. हा व्हिडीओ अपघातापूर्वी काही वेळ अगोदरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे एका दुचाकीवर 4 जण त्यात मोबाईल वर रिल बनवणे या 4 ही जणांना चांगलेच महागात पडले आहे..यात जो गाडी चालवतोय तो स्वप्नील चव्हाण असून त्याचा हा अपघातात एक हात तुटलाय.. तर शंतनू सोनवणे या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजन आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

dr. kendrekar

 

प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनासाठी पाथरीच्या कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयाकडे डाकू पिंपरी येथील नववीचे 4 विद्यार्थी एकाच दुचाकीवर जात होते. त्यांच्या दुचाकी आणि ऑटोचा भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी 7 वाजता घडला ज्यात डाकू पिंपरी येथील स्वप्नील चव्हाण, राहुल तिथे,शंतनू सोनवणे, योगानंद घुगे असे 4 विद्यार्थी होते. हा अपघात इतका भीषण होता की एका विद्यार्थ्यांचे हात रस्त्यावर तुटून पडल्याचं उपस्थितांनी सांगितलं. या अपघातात शंतनू या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय.

error: Content is protected !!