परभणीत छाननी मध्ये एका उमेदवाराचा अर्ज अवैध,वाचा कोण आहे…

0 660

परभणी, दि. 5  17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकुण 42 उमेदवारांनी 65 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज दि.5 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

निवडणूक आयोगाचे निरीक्षक कृष्णकुमार निराला यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात नारायण तुकाराम चव्हाण (अपक्ष) यांचा नामनिर्देशन अर्ज अवैध ठरला.

यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची उपस्थिती होती. उमेदवारांना सोमवार, दि. 8 एप्रिल, 2024 पर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहे. शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी जाहिर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!