एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याने समाजातील इतर दहा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरीत करावे-प्रा. रफीक शेख

0 88

सेलू / प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी अशक्य हा शब्दच डोक्यातून काढून टाकावा, मन लावून, जिद्दिने, आत्मविश्वासाने अभ्यास करुन वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासह स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे. तसेच यश संपादन केल्यानंतर या यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजातील किमान दहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन उच्च शिक्षणासाठी प्रेरीत करावे असे आवाहन ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद फाऊंडेशनचे संचालक विद्यार्थी मित्र प्रा‌. रफीक शेख यांनी केले. येथील अल फलाह एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात मोटिवेशनल मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दिनांक 29जून 2024रोजी साईनाट्य गृह येथे साय 7वाजता हा कार्यक्रम झाला.

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते हाजी शफीक अली खान हे होते‌‌. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अजहर अहेमद सिद्दिकी व रफिक शेख सर हे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष इंजि. अनिस कुरैशी, उपाध्यक्ष शेख शमशोद्दिन, पठाण इंजि. रशिद खान, हारुण सर, जावेद घौरी, इम्रान कुरैशी, जकी अहेमद सिद्दिकी आदिंच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणुन बदनापूर एम. बि. बि. एस. मेडीकल काॅलेजचे डीन सेलू चे भुमि पुत्र डाॅ‌. अझहर अहेमद सिद्दिकी यांनी वैद्यकीय शिक्षण तयारी व प्रवेश पध्दती बाबत मार्गदर्शन केले. मौलाना सादेख नदवी यांनी आपल्या मनोगतातून धार्मिक शिक्षण व आधुनिक शिक्षण यांची सांगड घालून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात इमाम सर यांनी कुराण शरीफ पठणाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल फलाह एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सचिव शेख महेमुद सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कोषाध्यक्ष तथा साईबाबा बँक चे व्यवस्थापक पठाण निसार यांनी करुन दिला. व्यासपीठावर मौलाना तज्जमुल अहेमद खास़मी, मौलाना खाजा साहेब, मौलाना शफीक साहेब सह प्रमुख पाहुणे डाॅ. अझहर अहेमद सिद्दिकी, विद्यार्थिमित्र प्रा‌. रफीक शेख व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या प्रसंगी इयत्ता दहावी, बारावीतील मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत नविन हाफेज ए कुराण झालेल्या मौलानांचा व समाजातील नविन डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला.तसेच या प्रसंगी 10 मध्ये सेलू तालुक्यातून उर्दू माध्यमातून मुस्लिम विध्यार्थी पैकी तालुक्यातून प्रथम क्रमांक ने उत्तीर्ण झालेली कु आयशा उमीज मोबीन खान हिने 90टक्के गुण घेतले तसेच दोन्ही पायाने व एका हाताने दिव्यांग असणाऱ्या शेख सोहेल शेख रफिक या विद्यार्थ्याने इ 12 वी चांगल्या गुणाने उत्तीर्ण केल्याने या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप हाजी शफिख अली खान यांनी केले या प्रसंगी इयत्ता दहावी, बारावीतील मुस्लिम, समाजातील गुणवन्त विध्यार्थी सोबत नविन हाफेज ए कुराण झालेल्या मुलाचा व समाजातील नविन डॉक्टर पदवी घेणाऱ्या चा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मौजम सर यांनी तर आभार प्रदर्शन इंजि. अनिस कुरैशी यांनी केले. मौलाना तज्जमुल अहेमद खास़मी यांच्या दुआ पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, जावेद घोरी, शेख असगर, पठाण निसार, सोहेल खान,इम्रान कुरेशी जिशान कुरेशी, हारून बागवान, इत्यादी नि परिश्रम घेतले

error: Content is protected !!