सेलूत कालिंका देविच्या रौप्य महोत्सवाचे आयोजन

0 149

सेलू, नारायण पाटील – येथील विद्यानागर भागातील कासार समाजाचे कुलदैवत असलेल्या कालिंका देवीचा रोप्य महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जाणार आहे.

 

shabdraj add offer

या मध्ये दि २०डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी ८ वाजता देवीला अभिषेक व महापूजा होणार आहे .सकाळी साडेदहा वाजता मान्यवरांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा होणार आहे .यावेळी खासदार संजय जाधव आमदार मेघनादीदी बोर्डीकर ,माजी आमदार हरिभाऊ लहाने ,विजयराव भांबळे ,माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर ,विनोद बोराडे ,मारोतराव चव्हाण ,माजी जी प सभापती अशोक नाना काकडे ,राम पाटील ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल कथले यांच्या सह समाजातील पदाधिकारी व मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

 

दुपारी १२.४० वाजता सामूहिक आरती व समाजाच्या वतीने आयोजित विवाह सोहळा संपन्न होणार आहे .व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .देवीच्या स्थापना दिवस कार्यक्रमात दरवर्षी समाजातील गरिबांच्या पाल्याचे विवाह मोफत लावले जातात .व त्यानुसार दोन विवाह या सोहळ्यात लावले जाणार आहेत.

 

कै राधाबाई वानरे यांच्या स्मरणार्थ माधवराव वानरे हे या कार्यक्रमातील महाप्रसादाचे मानकरी असून स्वयंपाक सेवा परभणी येथील शिवाजीराव शिनगारे हे मोफत देणार आहेत .तसेच अनेक समाजबांधव या वेळी अल्पोपहार ,चहापान व जलसेवा देणार आहेत.

 

तरी या सर्व कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी मंडळाच्या वतीने अध्यक्ष अशोक कासार ,उपाध्यक्ष रामप्रसाद वराडे ,अशोक वानरे व सचिव गजानन हेलसकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!