बुद्धांच्या मानवतावादी विचाराचे प्रतिबिंब भारतीय संविधानात…! भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन.

0 19

पूर्णा- भारतीय संविधान दिन पूर्णा शहरात नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड यांच्या आयोजनाखाली अखिल भारतीय भीक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ .आंबेडकर चौक पूर्णा या ठिकाणी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम.यु.खंदारे यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.या नंतर झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे होते,प्रमुख अतिथी म्हणून जामा मशिदचे पेश इमाम शमीम मोहम्मद अन्सारी ,सय्यद मुदस्सीर सय्यद गणी, पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पौळ,स्वागताध्यक्ष माजी नगर परिषद आरोग्य सभापती विधितज्ञ हर्षवर्धन गायकवाड हे होते.
भदंत पय्यावंश यांनी उपस्थितांना त्रीशरण पंचशील दिले.
या वेळी भारतीय संविधानाविषयी संबोधित करत असताना भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी भारतीय संविधानाची महती विषद करत असताना सांगितले महामानव तथागत भगवान बुद्धांच्या विचाराचे प्रतिबिंब भारतीय संविधानामध्ये पहावयास मिळतात.
समस्त मानव जातीचे कल्याण भारतीय संविधानामध्ये आहे.
या वेळी डॉ.विनय वाघमारे, मुगाजी खंदारे, दादाराव पंडित,अब्दुल मुजीब सर, प्रज्ञा गायकवाड यांची समयोचीत भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी पंडित सर यांनी केले.यावेळी धार्मिक,सांस्कृतिक,क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या पंचशील नाट्यग्रुप, समता सैनिक दल व वर्षावासामध्ये ग्रंथ वाचन करणारे ग्रंथ वाचक यांचा पुष्पगुच्छ व संविधानाची प्रास्ताविका देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी किशोर वयीन बालकाची संविधान नाटिका सादर करण्यात आली.
भारतीय संविधान दिन आयोजना पाठीमागची भूमिका स्वागताध्यक्ष हर्षवर्धन गायकवाड यांनी विशद केली. अध्यक्षीय समारोपात आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांनी भारतीय संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यामध्ये राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत. या देशामध्ये संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रमुख उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम,हाज़ी खुरेशी,उत्तम  खंदारे, डॉ. विनय वाघमारे, अमृत कदम (सचिव,श्री गुरु बुद्धि स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ, पूर्णा ),डॉ. संदीप जोंधळे, डॉ. गजानन शिंदे (अधीक्षक सिविल हॉस्पिटल पूर्णा ), डॉ. नागेश देशमुख (वैद्यकीय अधिकारी पूर्णा ), डॉ. गणेश काचगूंडे(वैद्यकीय अधिकारी पूर्णा ), अमजद नुरी, प्रवीण अग्रवाल,एडवोकेट धम्मा जोंधळे, मधुकर गायकवाड, एडवोकेट राजू भालेराव,अखिल अहमद, राजू नारायणकर, रवि वाघमारे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्ासाठी प्रशांत वाघोदे,अविनाश वेडे,प्रवीण कनकुटे, अतुल गवळी व रोहिणी महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!