चार ग्रामीण रस्त्यासाठी ६.३७ कोटी रुपये निधी-आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची माहीती
प्रतिनिधी
चांगले दळणवळण आणि विकासाची पाऊलवाट बळकट करण्यासाठी रस्ते आवश्यक असतात. शहरी व ग्रामीण भागांना जोडणारा दुवा म्हणजे रस्ते होय. म्हणूनचं गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील काही भागातील विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते बांधकाम, दुरुस्ती अत्यंत गरजेची आहे.
त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रामा २४८ ते वाघदरा, वाघदरा तांडा ग्रामा ४६,४७ रस्ता सुधार कामाकरिता १.४६ कोटी रुपये, रामा २४८ ते पांढरगाव ग्रामा ४९ रस्ता सुधार कामा करीता १.६१ कोटी रुपये, रामा २४८ ते चीलगरवडी इजिमा २४ रस्ता सुधार कामा करीता १.४७ कोटी रुपये आणि रामा २४८ ते देवकतवाडी रस्ता सुधार कामा करीता १.८३ कोटी रुपये असे एकूण चार रस्त्यांच्या ग्रामीण रस्त्यांच्या विकास कामाकरिता ६.३७ कोटी रुपये आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून या रस्त्यांच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आ. गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दळणवळण सोयीस्कर होणार असल्याचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
यावेळी तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते,सरपंच समाधान चीलगर, माजी सरपंच शेषराव चिलगर, सरपंच मुंजाजी खांडेकर, सरपंच गोविंद सानप, बाळासाहेब खाकरे, ह.भ.प. रामकिशन महाराज चिलगर, दत्ता महाराज सानप, मगर चिलगर, उपसरपंच जनार्धन हाके,अभियंता नितीन मुंडे, जयराम जाधव, गुत्तेदार प्रकाश चाटे, मा. कृषी अधिकारी श्री कासले, मुख्याध्यापक मुंडे सर, भास्कर ठवरे, प्रकाश सानप, तुकाराम मंडगे, निवृत्ती सानप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.