आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीेचे होणार ‘या’ दिवशी प्रस्थान
आषाढी पालखी म्हटलं की पंढरपूरनगरीमधील विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्तमंडळी, अन् एकच विठ्ठल नामाचा गजर. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे.
यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष असून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली.
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे- जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे.
रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निधुन औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसर्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जुनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जुनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार 14 जुन लोणीकाळभोर, गुरूवार 15 जुनला यवत, शुक्रवार 16 जुन वरवंड, शनिवार 17 जुन उंडवडी गवळ्याची, रविवार 18 जुन बारामती, सोमवार 19 जुन सणसर, मंगळवार 20 जुन आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार 21 जुन निमगाव केतकी, गुरूवार 22 जुन इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार 23 जुन सराटी, शनिवार 24 जुन रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल. रविवार 25 जुन रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26 जुन रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल.
मंगळवार 27 जुन रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल. बुधवार दि.28 जुन रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार 29 जुन रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल. गुरूवार दि. 29 जुन ते सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी दुपार पर्यंत त पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. 3 जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरवात करेल. पालखी परत येताना 10 दिवसांचा प्रवास करून 13 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल.
असा असेल परतीचा प्रवास-
सोमवार 3 जुलै थोरल्या पादुका येथे अभंग आरती होऊन वाखरी येथे मुक्कामी राहिल. मंगळवार 4 जुलै रोजी महाळुंगे, बुधवार 5 जुलै रोजी वडापूरी, गुरूवार 6 जुलै रोजी लासुर्णे, शुक्रवार 7 जुलै रोजी बर्हाणपूर, शनिवार 8 जुलै रोजी हिंगणीगाडा, रविवार 9 जुलै वरवंड, सोमवार 10 जुलै उऱूळी कांचन, मंगळावार 11 जुलै रोजी नवी पेठ पुणे, बुधवार 12 जुलैला पिंपरी गाव, गुरूवार 13 जुलैला देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात पालखी विसावेल.