कोजागिरी पौर्णिमा निमित्त शाम-ए-गज़ल़ कार्यक्रम

0 40

ओजस क्रियेशन, मुंबई आयोजित कोजागिरी पौर्णिमा निमित्त शाम-ए-गज़ल़ कार्यक्रम अॅडजॅन स्टुडियो बोरिवली पश्र्चिम येथे शनिवार २८ आॅक्टोबर रोजी संपन्न झाला. आयोजिका ज्योती कुलकर्णी या लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका आहेत. वृत्तपत्रात त्यांचे समाज प्रबोधनाचे व सकारात्मक लेख नियमित येत असतात. गेली ५ वर्ष त्या असे म्यूजिक शो यशस्वीपणे आयोजित करत आहेत.
त्यांचे मिस्टर श्रीकांत कुलकर्णी यांची त्यांना मोलाची साथ आहे. ते व्यवसायाने सिवील इंजिनियर आहेत व त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रक्षिक्षण घेतले आहे आणि ते प्रोफशनल सिंगर आहेत व नवोदित गायकांना ते मार्गदर्शन करतात

 

 

विशेष अतिथी फिल्म टीवी स्टार प्रदीप शर्मा जी, उपेन्द्र पंडित जी, संपादक अमरदीप पेपर, स्मृति वेंगुर्लेकर स्वरांजली एंटरटेनमेंट, साकेत जी व मातोश्री छाया जैन जी सरगम म्यूजिक व छाया एंटरटेनमेंट, उमा जी व संदिप जी कपाड़िया ए वी स्टार म्यूजिक एंटरटेनमेंट, ह्रदया इवेंट चे भाग्यश्री व अमित गावडे, विकास गायकवाड, संगीतकार गायक, अल्ताफ शहा, डेप्युटी जनरल मॅनेजर अल्ट्राटेक सीमेंट, ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम बहारदार झाला. सर्वांनी हिंदी ग़ज़ल व सूफी गीतांचा आनंद घेतला व पुढिल वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

सुप्रसिद्ध गायक प्रसाद दलाल, श्रावण मोरसकर, मधुकर दळवी, श्रीकांत कुलकर्णी, राजेन्द्र बलवल्ली, विकास गायकवाड, रुपा देवरुखकर, लिनीका सिंह, सुरेखा गवांडे, निमिशा श्रीवास्तव, पुनम शानबाग, डाॅ नीता अराणे, चंचल शेट्टी, भक्ती पांचाल, निर्मला गजांकुश, शिल्पा गांवकर, यासर्व गायकांची ग़ज़ल व सूफ़ी गाणी तर उत्तम झाली.

 

 

ज्योती कुलकर्णी यांनी लिहिलेली व किशोर कट्टीनी संगीतबद्ध केलेली शादाब अल्बम मधली प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांनी गायलेली ग़ज़ल “फिर वही दिवानगी…” निमिशा जी नी प्रस्तुत केली आणि सर्व रसिकजनांनी त्याला पसंतीची पावती दिली. विशाल प्रभुखाडपे व लिनीका सिंह यांनी सुरेख शेरों-शायरी करत निवेदन केले व त्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमानंतर सर्वांनी रुचकर जेवणा सोबत केशरी दुधाचा आस्वाद घेतला.

 

 

Tune into music ब्रिदवाक्य असलेले ओजस क्रियेशनच्या आयोजिका ज्योती कुलकर्णी व इंजीनियर श्रीकांत कुलकर्णी हे विविध संगीत कार्यक्रम आयोजित करतात. १८ जुलैला त्यांच्या ओजस क्रियेशन वतीने संगीत पहिला कार्यक्रम सादर केला व आत्तापर्यंत त्यांनी भक्ती संगीत, सदाबहार मराठी गीत, लता-आशा स्पेशल अशा वेगवेगळ्या थीमचे १० कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले आहेत. भविष्यात दिवाळी संध्या, क्रिसमस निमित्त म्यूजिक शो आयोजित करणार आहोत असे त्या बोलल्या.
संगीतातुन व समाजसेवेतुन आनंद व समाधानाचे काही क्षण मिळावे यासाठी ओजस क्रियेशन बॅनरचे नियमित संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस ज्योती व श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!