“भारतीय महिलांच्या सक्षमीकरणाचा आराखडा” या विषयावर कार्यशाळा

0 208

 

पुणे – निर्भय कन्या अभियान अंतर्गत, विद्यार्थी विकास मंडळ, यातर्फे “भारतीय महिलांच्या सक्षमीकरणाचा आराखडा” या विषयावर लवळे (ता. मुळशी) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे विद्यार्थांसाठी नुकतीच एक कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचा समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री राघवन कोळी (संस्थापक, लेखक, प्रेरक वक्ता) उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना श्री राघवन कोळी म्हणाले की, राज्यात युवा आणि महिला वर्गासाठी विकासाच्या अनेक उपयुक्त संधी उपलब्ध आहेत. बदलत्या काळानुसार, महिलांना समाजात सशक्तीप्राप्तीसाठी उपाय कशे करता येईल, याची संकल्पना अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केली.

 

 

या कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक सहायक प्रा. डॉ. ज्योती ढाणके, विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांनी केले. ते नेहमीच विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमांचा एक भाग होण्यासाठी प्रवृत्त करत असतात जे त्यांच्यासाठी मोठी मदत आहे. पुरुषप्रधान संस्कृती असावी की महिलाप्रधान संस्कृती असावी यापेक्षा समसमान संस्कृती आपण निर्माण केली पाहिजे. कुठलाही भेदाभेद आपल्यामध्ये नसला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 

 

 

ज्योती ढाणके यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगितले. या कार्यक्रमास संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय पाटकर, यांत्रिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुनील पाटील, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अतुल वाणी, स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय पाटील, अभियांत्रिकी विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शिखा भारद्वाज आदी उपस्थित होते. कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये १२५ पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागातील आर्य मोकाशी या विद्यार्थ्यांने केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मदत केली त्यात निखिल अंभोरे, क्रिश गुप्ता, साईराज जेवे, चंद्रकांत घोडके, पल्लवी चवरे, श्रुती कडव, अनिकेत तावडे यांचा समावेश होता.

error: Content is protected !!