शारदा महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

0 11

परभणी : दि.23 येथील शारदा महाविद्यालयात स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम अर्थशास्त्र विभागाकडून आयोजित करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे तर प्रमुख पाहुणे डॉ. सच्चिदानंद खडके व डॉ.नुरुल अमिन उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. सच्चिदानंद खडके म्हणाले की, सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे या महापुरुषांचे विचार प्रेरणादायी आहेत. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. तर डॉ. नुरूल अमिन यांनी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे हे स्वाभिमानी तसेच देशभक्त होते, त्यामुळे त्यांचे विचार प्रत्यक्षात येणे ही काळाची गरज आहे. अध्यक्षीय समारोप डॉ. संतोष नाकाडे यांनी केला.
यावेळी उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नितीन बावळे, डॉ. नवनाथ सिंगापुरे, डॉ. भगवान पाटील, डॉ. श्याम पाठक, डॉ. ज्ञानोबा मुंढे,डॉ. प्रशांत मेने, यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अविनाश पांचाळ यांनी केले.

error: Content is protected !!