शाळेत काय गौतमी पाटीलचा धडा द्यायचा का; शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या निर्णयावरुन सध्या शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने आमने आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
गौतमी पाटील पवारांच्या निशाण्यावर…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी अकोल्यामध्ये त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारच्या शाळा खासगी करणाला विरोध करताना गौतमी पाटीलच्या नावाचा उल्लेख करत जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले?
आपल्या भाषणावेळी शरद पवार यांनी नाशिकमधील (Nashik) एका शाळेचा दाखला दिला. नाशिकमध्ये एक शाळा आहे. या भागात द्राक्षाच उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. द्राक्षापासून दारुही तयार होते. ही दारु तयार करणाऱ्या कारखान्याला राज्य सरकारने शाळा दत्तक म्हणून दिली.
ऐकलयं का नाव? पवारांचा सवाल…
“ही शाळा कशी चालते याबाबत मी माहिती घेतली. यावेळी मला समजलं की मागच्या महिन्यात या शाळेत एक कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम होणाचा? तुम्हाला नाव माहित आहे की नाही मला कल्पना नाही असे म्हणत गौतमी पाटील, ऐकलय का नाव?” असा सवाल पवारांनी उपस्थितांना विचारला.
शैक्षणिक संस्थांचे पावित्र्य राहू द्या…
“शाळेत गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला. आता तुम्ही सांगा मुलांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा मुलांना शिकवायचा का? कुणासाठी करतोय? काय संस्कार देणार आहोत आपण मुलांना? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. तसेच शैक्षणिक संस्थांचे पावित्र्य राहु द्या…” असेही शरद पवार यावेळी म्हणाले. (