ज्ञानोपासक शाळेचा विद्यार्थी श्रेयस कदमचा समीर दुधगांवकर यांच्याकडून सत्कार

0 61

परभणी,दि 11 ः
राज्याच्या टॉप 60 विद्यार्थ्यात बोरीतील ज्ञानोपासक शाळेचा विद्यार्थी श्रेयस कदमचा श्री.समीर गणेशराव दुधगांवकर यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा!ज्ञानोपासक विद्यालय, बोरी ता.जिंतूर जि. परभणी येथील विद्यार्थी श्रेयस कदमची Services Preparatory Institute साठी निवड झाली आहे. या institute द्वारे NDA साठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते. त्या निमित्ताने समीर गणेशराव दुधगांवकर यांनी श्रेयस कदम व त्याच्या परिवाराची भेट घेतली व संवाद साधला!
इयत्ता दहावीनंतर ही परीक्षा देता येते. हजारो विद्यार्थ्यांमधून फक्त 60 विद्यार्थी यातून पुढे जातात. यावर्षी 18000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि त्यातून त्याची निवड झाली आहे, हे विशेष !श्रेयसचे वडील हे जिल्हा परिषद शिक्षक असुन त्यांच्या मुलाचे हे यश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. श्रेयसचे विशेष कौतुक यामुळे वाटते की 8 दिवसात व्यवस्थित तयारी करून हे यश त्याने मिळवले आहे. राज्य माध्यमिक आणि CBSE दोन्ही अभ्यासक्रमाचा मिळुन पेपर असल्याने श्रेयसचे यश डोळे दिपवणारे आहे.त्याच्याशी बोलताना श्रेयस नी सांगितले की, “बेसिक एकदम क्लिअर आहे आणि त्यामुळेच इतक्या कमी वेळात हे यश संपादन करू शकलो”.एका कर्तृत्ववान भूमिपुत्र गणेशराव दुधगांवकर यांच्याकडून अजून प्रेरणा घेऊन मराठवाड्याचे नाव त्याने देशभर गाजवावे यासाठी सत्यागृह दैनंदिनी देऊन श्रेयसचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !

error: Content is protected !!