तर पडळकरांना चोप देऊ..राष्ट्रवादी आक्रमक…महायुतीत आता नवा संघर्ष

0 179

: भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर  टीका करताना त्यांना लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यानिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं ही पाहायला मिळालं.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही वेळापूर्वी दिल्ली येथे टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”

गोपीचंद पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो, तुमचा तो पाळलेला कुxx गोप्या हा त्याच्या लायकीपेक्षा जास्त भूंकतोय. आज तो त्याच्या लायकीबाहेर भूंकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर अशी आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो आपल्या जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही. सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही, देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाया गेलेल्या गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी, वेसण घालावी.
आमदार अमोल मिटकरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हणाले, तुम्ही गोप्याला वेसण घातली नाही तर त्याचा उसळता वारू आम्ही आवरू, त्याला वेसण घालण्याची क्षमता अजित पवारांच्या प्रत्येक कार्यकर्त्यात आहे. गोपीचंद पडळकरला अजित पवारांविरोधात निवडणुकीला उभा राहिल्यावर बारामतीकरांनी त्याची लायकी दाखवून दिली आहे. मात्र राजरोजसपणे अजित पवारांवर तोंडसूख घेणाऱ्या गोप्याला तुम्ही आवर घलणार की नाही? तुम्ही त्याला आवर घालणार नसाल तर आम्हाला आवरणं तुमच्यासाठी कठीण होईल. ही आमची सूचना आहे. गोप्यासारख्या रान### वेळीच आवर घाला.

error: Content is protected !!