विद्यार्थ्यांनी परिश्रम करून यश संपादन करावे-विनोद बोराडे

0 37

सेलू / नारायण पाटील – यश मिळवण्यासाठी परिश्रमाची सांगड घालणे गरजेचे आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन यश संपादन करावे .असे आवाहन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलतांना केले.

 

सेलू 31 मार्च रविवार रोजी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील योगा हाॅल मध्ये निर्मिक कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शिवाजी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्रा मदन इदगे, क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे, पि.के .शिंदे ,बबन घुले ,बापुराव डाके, हरिभाऊ बरसाले आदीची उपस्थिती होती.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे यांनी केले. डॉ.शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांची वाचनाची आवड वाढण्यासाठी काय प्रयत्न करावेत याबद्दल मार्गदर्शन केले.

 

 

पि. के.शिंदे यांच्या ‘या झोपडीत माझ्या ‘ या गिताने विद्यार्थ्यांचा मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमात एस. एस. सी. मार्च 2023 परीक्षेत इंग्रजी विषयात 98 गुण प्राप्त करुन राज्यात तृतीय आणि क्लासमधून प्रथम आलेली त्रिवेणी डाके या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सानिका तांगडे , नम्रता पवार, पुनम घुले, अंजली साखरे ,रवी जोगडे, ज्ञानेश्वर पौळ, कीर्ती पवार, भक्ती चाफेकर, ज्ञानेश्वरी भगस आदी एस. एस. सी मार्च 2023 या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षीच्या क्लासेसच्या 1ली ते 10 वीचा बेस्ट स्टुडंट अवार्ड मिळालेले विद्यार्थी सोनाली पवार, विवेक खूपसे, अनुजा नीलवर्ण, संमृद्धी कदम,यशोदा पाटील, निकिता बरसाले, दिव्या जोगडे, नारायण जावळे, प्रज्ञा सूर्यवंशी, स्वस्तिक गोरे, वैष्णवी खुरुसणे, शरद गायकवाड, दुर्गा भिसे, अक्षरा गाडेकर, किर्ती धोंगडे, गौरव भिसे,यश ताठे, कर्तव्य शेळके,करण सौदागर, आदित्य मोरे, वायाळ आरव, तौर आयुष या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलण सतिश बरसाले यांनी केले तर सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , गिरीश पाईकराव, कमलाकर वायाळ,राम नखाते आदींनी परिश्रम घेतले .

error: Content is protected !!