सक्सेस ॲप ‘ बालनाट्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण

0 50

परभणी,दि 09 ः
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने 19 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पोखर्णी नृसिंह येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने नांदेड येथे ‘ सक्सेस ॲप ‘ या बालनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण झाले.
आत्मविश्वास हाच सक्सेस ॲप आहे ही टॅगलाईन घेऊन सादर केलेल्या या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन त्र्यंबक वडसकर यांनी केले होते. या बाल नाट्यात बाल कलावंत प्रीती पांचाळ, धनश्री एडके, पूजा गमे , संध्या जवंजाळ, प्रांजली वाघ, शुभांगी पांचाळ, वैष्णवी कदम, सायली वाघ, वेदिका मुळे, अंजली वाळके, पुनम आव्हाड, वेदिका तसनूसे, ऋतुजा वाघ, निकिता सातपुते, कृष्णा मस्के यांच्या भूमिका होत्या.
बालनाट्याचे निर्मिती प्रमुख प्राचार्य पी. बी. शेळके हे होते. शैलेश ढगे यांचे नेपथ्य, वीरेन दामुके व प्रा. संजय गजमल यांची प्रकाश योजना तर लक्ष्मीकांत जोगेवार यांचे संगीत होते या बालनट्यातील कलावंतांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.
सक्सेस ॲप…..
महात्मा गौतम बुद्धाने सांगितलेले अत: दीप भव हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्रकाश हा स्वतः झाला पाहिजे हा विचार या बालनाट्यातुन मांडला आहे. आत्मविश्वास हाच खरा सक्सेस ॲप आहे ही टॅगलाईन घेऊन लिहिलेले हे बालनाट्य आहे. कौटुंबिक आणि सामाजिक संकटांमुळे खचून गेलेल्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. परंतु विद्यार्थ्यांच्या आत मध्ये असणाऱ्या गुणांना चालना मिळाली आणि त्यांच्यातील न्यूनगंड जर दूर केला तर ते विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. हे या बालनट्यातून मांडले आहे.

error: Content is protected !!