महिला वृद्धाश्रमात जाऊन स्वीप पथकाने केली मतदार जागृती

0 37

परभणी/प्रतिनिधी
स्नेह ज्येष्ठ निराधार वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांच्या महिलांच्या मनात फुलवीले नवआशांचे व मतदानाचे अंकूर…
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.४एप्रील २०२४ रोजी,तालुका मतदार जन जागृती पथक निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय परभणी महाराष्ट्र शासनाच्या या पथकाने सकाळी ८वा.’स्नेह जेष्ठ निराधार महिला वृद्धाश्रम मौ.असोला ता.परभणी येथे मतदार जागृतीच्या हेतूने भेट दिली.वृध्दांच्या प्रत्यक्ष भेटीत व साधलेल्या संवादात पथकाला या महिलांच्या मनातील मतदानाबद्दल कमालीची अनास्था व निराशा प्रकर्षाने जाणवली.
वेळेचे औचित्य साधून तालुकास्तरीय स्वीप सदस्य लक्ष्मण गारकर,सुधाकर गायकवाड,लोककलावंत कवी. का.रा.चव्हाण,प्रा.शिवाजी कांबळे,गंगाधर परसोडे आदी पथक सभासदांनी आपल्या जगण्यावरच निराश झालेल्या वृध्दमहिलांशी सुसंवाद साधला व त्यांना बोलकं केलं तेव्हा,तेथील वृद्धांपैकी वार्धक्याने थकलेली असोला येथील पांचाळ परिवारातील अनाथ वृद्धेने आपल्या मनोगतात शोकांतिका मांडत सांगितले की,
“स्वतःच्या मुलांनीच जर आम्हाला वा-यावर सोडून दिले,तर हे शासनाचं मतदान आम्हाला कोणता थारा देईल?”
या प्रसंगी वृध्दाश्रमातील या मातेने,आपल्या मुलानेच दिलेली निराशा गितातून मांडताना “आई माझ्या बंगल्याची हवा तुला सोसना..!तू यापूढे वृध्दाश्रमालाच जाना..!!” अगतीक मनाने स्वीप पथकाजवळ गीत कवण केले तेव्हा पथक तर क्षणभर निःशब्दच झालं होतं.
परिस्थिती लक्षात घेऊन,पथकातील कवी.का.रा.चव्हाण यांनी,वृद्धांना उद्देशून, “आई मी आलोय गे घरी तुजला नेयाला.!आता वृद्धाश्रमातं नको ग राहू !चल दोघं मतदानालाही जाऊ!!”
अशा आपल्या गितातून कवी.का.रा.चव्हाण यांनी वृद्धांची मनधरणी करीत मतदान केंद्रावर मतदानाला जाण्याचेही आवाहन केले.व त्यांच्या मनात उर्वरित आयुष्य सकारात्मकतेने जगण्याची आशा का.रा.चव्हाण यांनी आपल्या जागरातून हळूवारपणे अंकुरित केली. तेव्हा निराधार महिलांनी आनंदाश्रूंनी भरून आले व मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्याचा आनंदाने होकाराचा शब्द पथकाला दिला.व स्वीप पथक जड अंतःकरणाने वृध्दाश्रमातून पुढील प्रचार दौ-यावर रवाना झाले.वृद्धाश्रमातील हा केविलवाना प्रसंग स्वीप कडून कळाला,तेव्हा स्वीप पथकातील सर्व कलावंतांचे कौतुक करत, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार डॉ.संदीप राजापुरे, नायब तहसिलदार लक्ष्मीकांत खळीकर,नायब तहसिलदार श्रीमती अनिता वडवलकर,
गटशिक्षणाधिकारी सुभाष आम्ले,श्रीमती एस.एम.टाक या सर्वांनी या परभणी तालुका स्वीप पथकाला पुढील मतदार जागृतीसाच्या यशप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!