हभप डॉ.श्री.हनुमान ठाकुरबुवा यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

0 50

परभणी – तालुक्यातील सिंगणापूर येथे ४ मार्च पासून सुरु असलेल्या महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार ११ मार्च रोजी हभप डॉ. हनुमान महाराज ठाकुरबुवा लोहगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

या सप्ताहानिमित्त सिंगणापूर येथील श्री मोठा महादेव बेलेश्वर मंदिरात दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, शिवपुराण कथा, महाप्रसाद, धुप आरती, हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवारी हभप हनुमान महाराज ठाकुरबुवा लोहगावकर यांचे सकाळी ११ ते १ वाजता काल्याचे कीर्तन झाले. यावेळी प्रवचनात ते म्हणाले की, काला म्हणजे एकत्रिकरण. आठशे वर्षापासून साधू, संतांनी तळागाळातील समाजाला एकत्र करुन पंढरपूरात विचारांचा काला केला आणि समाज क्रांती घडविली. ही परंपरा आजही चालू आहे. संतांनी दिलेली शिकवण आजही आचरणात आणण्याची गरज असल्याचे हभप हनुमान महाराज ठाकुरबुवा यांनी सांगितले. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कथा सोहळ्यास पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,आयोजन गावकरी मंडळी सिंगणापूर यांनी केले होते.

error: Content is protected !!