शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक –आ.बाबजानी दुर्राणी
कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम
सेलू(प्रतिनिधी)दि 17 – आज समाजात अनेक लोक अतिशय मेहनत घेतात.शून्यातून विश्व निर्माण करणे सोपे नाही.त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक असते.आणि अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था करत आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबजानी दुराणी यांनी अभिनंदन केले.तसेच यावेळी त्यांनी ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे(चारठाणकर ) यांच्या संस्थेला 25 लाख रुपयांचा निधी आ.बाबजानी दुराणी यांनी घोषित केला.
महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या 20 मान्यवरांचा गौरव यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुराणी हे होते तर विशेष उपस्थिती म्हणून ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. विजयराव भांबळे,जी.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने,माजी सभापती संजय साडेगावकर,कृ.उ.बा.चे.माजी मुख्य प्रशासक रणजित गजमल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे,सामाजिक कार्यकर्ते शफिक अली खांसाहब,पं.स.चे माजी सभापती पुरुषोत्तम पावडे,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी,उद्योजक ब्रिजगोपाल काबरा,साहित्यिकप्रा.के.डी.वाघमारे,उद्योजक जयप्रकाश बिहाणी,संयोजक अशोक नाना काकडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आ.बाबजानी म्हणाले की,कार्यकर्त्यांनी देखील प्रथम आपल्या व्यवसायाला प्राधान्य द्यावे.जर व्यवसायात प्रगती केली तर कुटुंब पूढे जाईल.यामधून आपले जीवनमान उंचावेल.
यावेळी माजी आ.विजय भांबळे म्हणाले की,कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अभिनंदन केले.समाजात काम करत असताना कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करता अविरतपणे काम करत राहणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे यांनी सांगितले की,सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रम मागच्या वर्षीपासून सुरू केला.सेलू शहरासह ग्रामीण भागातील नामवंतांचा गौरव करण्याच भाग्य आम्हाला लाभले.अडचणींवर मात करून समाजासाठी प्रेरणा देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा सन्मान आम्ही करतो.यावेळी त्यांनी ज्या 20 सन्माननीय व्यक्तीचा गौरव केला जाणार आहे त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी जी.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनीही मनोगत व्यक्त करून सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष जी.प.सदस्य अशोक नाना काकडे यांच्या कार्याचा गौरव केला.या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात सेवाभाव वृत्तीने कार्य करणाऱ्या 20 मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव उफाडे यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले आणि आभार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव उफाडे यांनी मानले