परभणी लोकसभा मतदार संघात एकुण 62.26 टक्के मतदान

0 127

परभणी, दि. 27  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार, (दि. 26) रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. परभणी लोकसभा मतदार संघात एकूण 62.26 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 62.43 टक्के तर 96-परभणी 62.62 टक्के, 97-गंगाखेड, 63.00 टक्के, 98-पाथरी 64.27 टक्के, 99-परतुर 59.60 टक्के आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 60.93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, परभणी लोकसभा मतदार संघात एकुण 62.26 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
***

error: Content is protected !!