श्री.परशुराम जन्मोत्सव पत्रिकेचे अनावरण

0 52

सेलू / प्रीतिनिधी – ब्राम्हण समाजाचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या भगवान परशुराम जन्मोत्सव हा सेलू शहरात दि.१० मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे .
या भगवान परशुराम जन्मोत्सवात समाज बांधव व भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग असावा यासाठी श्री.परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन मोठ्या संख्येने जन्मोस्तव पत्रिकेचे वाटप केले जाणार आहे .

 

त्यानिमित्ताने आज संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात शोभायात्रा पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

श्री.परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जन्मोत्सवासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विधायक कार्य देखील हाती घेतले जातात.
तरी या भव्य शोभायात्रेत समाजबांधवानी व महिलाभगिनींनी तसेच परशुराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

error: Content is protected !!