शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

0 1,468

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर (shivsena logo) ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (central election commission) बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती.

 

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती.

dr. kendrekar

 

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्हा गोठवलं आहे. आता ठाकरे गट किंवा शिंदे गटाला हे चिन्हा वापरता येणार नाही. अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही.

 

गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा असणार नाहीये. सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी तीन पर्याय दुपारी तीनपर्यंत सादर करावे लागतील.

error: Content is protected !!