लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार? महत्वाची माहीती समोर आली

0 128

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांकडून याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो शक्यता व्यक्त केली जात होती. आता ताज्या माहितीनुसार लोकसभेच्या तारखा १३ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होऊ शकतात असे समजते.

लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याआधी निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरचा दौरा करू शकते.याशिवाय आयोगाने पश्चिम बंगालमधील संवेदनशील मतदान केंद्रांची यादी मागवली आहे. गेल्या वेळी प्रमाणे यावेळी देखील निवडणुका ७-८ टप्प्यात होऊ शकतात.२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात झाल्या होत्या. तेव्हा आयोगाने १० मार्च रोजी घोषणा केली होती. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या कालावधी सात टप्प्यात मतदान झाले होते आणि २३ मार्च रोजी निकाल जाहीर झाला होता.

नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या तर भाजप आघाडीने ३५३ जागा मिळवल्या होत्या.निवडणूक आयोगातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आयोग निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अनेक राज्यांचे दौरे करत आहे. हे दौर पूर्ण झाल्यानंतर तारखांची घोषणा होऊ शकते. सध्या आयोग तामिळनाडूचा दौरा करत आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा दौरा असेल. हे सर्व दौरे १३ मार्चच्या आधी पूर्ण होण्याची आशा आहे.
आयोग गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकांची तयारी करत आहे. सर्व राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांशी बैठका घेत आहेत. जे भाग संवेदनशील आहेत तेथे सुरक्षा व्यवस्था, सीमाभागात अधिक खबरदारी घेणे आधी मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या वर्षी निवडणूक आयोग आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचा विचार करत आहे. ज्यात सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर खोटी आणि चुकीची माहिती हटवली जाईल. यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरून खोटी आणि गैरसमज पसरवणारी बातमी तातडीने काढली जाईल. एखादा पक्ष किंवा उमेदवार नियमांचे भंग करत असेल तर त्याच्याकडून तातडीने कारवाई केली जाईल. अशा उमेदवारांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते.

error: Content is protected !!