“मिशन ब्रेक द चैन”; नियम भंग करणाऱ्यांवर होणार आता कठोर कारवाई

1 185

नांदेड, प्रतिनिधी – जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी काल लागू केलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने “मिशन ब्रेक द चैन” या विषया अंतर्गत जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या,याबाबत संपुर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी होत असतांना शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी नगरपालिका हद्दीत मनपा आयुक्त,पोलीस अधिक्षक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,उपविभागीय दंडाधिकारी यांच्या सोबत समिती गठीत केली आहे.

नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रांमध्ये उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसीलदार,मुख्याधिकारी आणि पोलीस निरिक्षक यांच्यासह समितीचे गठण केले आहे.

गाव पातळीवर ग्राम पंचायत, तलाठी, पोलीस, कृषी सहाय्यक यांची एक समिती गठीत केली आहे.

या समितीने सार्वजनिक आणि खाजगी वाहतुक होतांना दुचाकीवर एक व्यक्तीपेक्षा दुसरा व्यक्ती आढळल्यास ५०० रुपये दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीचा दंड तसेच कार्यवाही विहित केली आहे,तीन चाकी वाहनांमध्ये १ + २लोकांना परवानगी आहे,यापेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास १ हजार रुपये दंड आणि मोटारवाहन कायद्याची कार्यवाही,चार चाकी वाहनांमध्ये १+२ पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास १ हजार रुपये दंड व मोटारवाहन कायद्याची कार्यवाही,सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान न करणे,सामाजिक अंतराचे पालन न करणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास यासाठी १ हजार रुपये दंड,टाळेबंदीच्या कालावधीत मुभा देण्यात आलेल्या विविध दुकानात ५ पेक्षा जास्त ग्राहक,दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क,शारिरीक अंतराचे पालन न झाल्यास ५ हजार रुपये पर्यंत दंड व पुढील पाच दिवसांसाठी दुकान सील होईल…

हात गाड्यांवर फळ व भाजी विक्रेत्यांना मुभा दिलेल्या वस्तू विक्री करतांना एकाच ठिकाणी थांबता येणार नाही,त्यांना ठरवून दिलेल्या गल्ली,कॉलनी,सोसायटी येथेच जावून विक्री करायची आहे,एकाच जागी थांबून विक्री केल्यास १ हजार रुपये दंड आणि जप्तीची कार्यवाही होईल,अंतर राज्य सीमेतून वैद्यकीय अत्यंत तातडीच्या कारणासाठी परवाना घेतलेल्या व्यक्तींना व माल वाहतूक वाहनांना प्रवेश मिळेल.

ग्रामीण,नागरी व औद्योगिक क्षेत्रात परदेशातून,परराज्यातून व जिल्ह्या बाहेरून प्रवास करून आलेल्या व्यक्तींबाबत ऍन्टी कोरोना कवच पुढील प्रमाणे कार्यवाही करेल,ज्यामध्ये अशा व्यक्तींना वैद्यकीय पथक येईपर्यंत गावातील समाजमंदीर,शाळा या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी, वैद्यकीय अधिकारी तात्काळ त्यांची तपासणी करतील,वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्यानुसार त्यांना गृह-अलगिकरण,तशी व्यवस्था नसेल तर गावातील समाजमंदिर व शाळा या ठिकाणी राहण्याची व जेवण्याची सोय करावी,लक्षणे आढळल्यास शासकीय विलगिकरण कक्षात दाखल करावे..

जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालय,गल्लीतील,कॉलनीतील व वसाहतीतल जनरल फिजीशियन यांच्याकडे उपचाराकडे आलेल्या रुग्णांमध्ये कोविड लक्षणे दिसली तर जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला त्याची माहिती द्यावी असे न केल्यास डॉक्टर विरुध्द कार्यवाही होईल,सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण फिरणारे व्यक्ती,समूह दिसून आल्यास त्यांच्याविरुध्द साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार पोलीसांनी कार्यवाही करावी.

सर्व संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधणे व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करावी नसता त्यांच्याविरुध्द खटला दाखल होईल,०७ जुलै ते १२ जुलै “मिशन ब्रेक द चैन” म्हणून गठीत केलेली पथके अत्यंत काटेकोर कार्यवाही करतील असे आदेश डॉ.विपीन यांनी दिले आहेत.

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
imp news – महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१



error: Content is protected !!